चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-दिनांक 8-9-2025 रोजी मौजे वांजरवाडा तालुका जळकोट येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळकोट आत्मा विभाग जळकोट यांच्यामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन एस पी लॉन्स वांजरवाडा येथे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वांजरवाडा गावचे प्रथम नागरिक श्री अविनाश नळदवार हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती श्री बालाजी ताकबिडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा लातूर श्री शिवसांब लाडके, तालुका कृषी अधिकारी जळकोट श्री एस आर पाटील,कृषी अधिकारी श्री अनिल गित्ते, उपकृषी अधिकारी श्री नानासाहेब धुपे हे उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री संतोष बेद्रे, कीटकशास्त्रज्ञ डॉ.श्री संदीप देशमुख, कृषी शास्त्रज्ञ श्री पी डी मताई सर हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा लातूर श्री लाडके सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती अभियान व महाविस्तार ॲप पिक विमा महाडीबीटी तसेच कृषी विभागाच्या विविध योजना व या योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.
मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री बेद्रे सर यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती व तेल बिया अभियान यांचे महत्त्व व प्रशिक्षण कार्यक्रमाचे संकल्पना उद्दिष्ट व फायदे इत्यादी शेतकऱ्यांना सांगून कार्यक्रमाचे सविस्तर असे प्रास्तावित केले.
कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर श्री संदीप देशमुख यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती योजनेचे महत्त्व सांगून शेतकऱ्यांनी खरीपामध्ये व रब्बी हंगामामध्ये नैसर्गिक निविष्ठा आपल्या प्रक्षेत्रावर कशाप्रकारे बनवावे व त्याचा आपल्या शेतीमध्ये योग्य वेळी योग्य वापर कसा करावा जसे की निंबोळी अर्क दशपर्णी अर्क जीवामृत बिजामृत ब्रह्मास्त्र अग्निस्त्र व इतर अनुषंगित नैसर्गिक निविष्ठा कशा प्रकारे तयार करावे याविषयी मार्गदर्शन करून कोणत्या कीड व रोग व्यवस्थापनासाठी त्यांचा उपयोग करावा तसेच तुर मर रोग व सततच्या पावसामुळे सोयाबीन पिवळे पडणे याविषयी उपस्थित शेतकरी व महिला शेतकरी यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कृषी शास्त्रज्ञ श्री पी डी मताई यांनी माती परीक्षण ते पिकांचे काढणी पर्यंतचे सखोल मार्गदर्शन करून त्यांचे शेतीमधील महत्त्व सांगितले.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाला आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री अभिलाष क्षीरसागर, सहाय्यक कृषी अधिकारी श्री विशाल इंगळे श्री उमेश सूर्यवंशी श्री प्रदीप रेड्डीवाड,अर्जुन बाचपल्ले, श्रीमती स्वाती भालके, अश्विनी खलसे, श्रीमती सुरेखा शिंदे व कृषी तालुका कृषी अधिकारी जळकोट कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सखी श्रीमती सुचिता मरेवाड, रत्नमाला पाटील, छाया मोटे,पार्वती चिद्रे,मंजुषा पांचाळ, कल्पना मोरे,ज्योसना बडे रूपाली पवार, स्नेहल गायकवाड, नंदाबाई सीमा आगलावे श्री राम पाटील, कृषी मित्र श्री संभाजी मोरे,श्री लक्ष्मण मरेवाड, शामराव आगलावे,उत्तम चिद्रे,चंद्रकांत मोरे, किशन बडे,दत्ता इंदुरे, रुपेश बिरादार, पुंडलिक वंगवाड, दत्ता इंदुरे,माधव जाधव, पत्रकार श्री ओमकार टाले इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाला जबलपूर डोमगाव, चेरा, धामणगाव, ढोरसांगवी, वडगाव,वांजरवाडा,
माळहिप्परगा सुल्लाळी चिंचोली व परिसरातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री अभिलाष क्षीरसागर व आभार प्रदर्शन श्री पुंडलिक वंगवाड यांनी केले.
0 टिप्पण्या