सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो.नं. 7058167098/9615179615
जामखेड :- दि.३०/०८/२०२५ रोजी पोनि श्री. दशरथ चौधरी साो. यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे अजित लालासाहेब उबाळे रा. चोंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा चोंडी ते चापडगाव जाणारे रोडवर त्याचे हातात अग्नीशस्त्र हत्यार विनापरवाना जवळ बाळगून फिरत आहे.
अशी बातमी मिळाल्याने मा.पोनि श्री दशरथ चौधरी साो. यांनी सदरची माहीती सपोनि श्री नंदकुमार सोनवलकर, पोकों/२४२७देविदास पळसे, पोकों/ ७५४ कुलदिप घोळवे अशांना देवून लागलीच सदरचे पथक खाजगी वाहनाने इसम नामे अजित लालासाहेब उबाळे रा. चोंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर याचा शोध घेणेकामी चोंडी येथे रवाना होवून चोंडी गावात शोध घेत असताना अजित लालासाहेब उबाळे रा. चौंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा १८/३० वाजणेचे सुमारास पथकास चौंडी ते चापडगाव जाणारे रोडवर सिना नदीच्या पुलाजवळ दिसला त्यावेळी त्याचे हातात अग्णीशस्त्र हत्यार दिसुन आले तेव्हा आम्ही त्यांचा पाठलाग केला असता तो सदरचे पथकास पाहुन नदीच्या किनारी असलेल्या काटेरी झाडात पळुन गेला होता.
त्यानंतर दि.०२/०९/२०२५ रोजी इसम नामे अजित लालासाहेब उबाळे रा. चौंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा गावटी कटटा हत्यार विनापरवाना बेकायदा स्वतःचे ताब्यात बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्मान करताना दिसुन आला आहे. म्हणुन त्याचे विरूध्द पोलीस कॉन्स्टेबल/ कुलदिप पांडुरंग घोळवे बक्वल नंबर-७५४ यांनी त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम १९३२ चे कलम ७ सह महाराट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनतर सदर आरोपीचा शोध घेत असताना तो पाटोदा गावचे शिवारात येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने सपोनि श्री नंदकुमार सोनवलकर, पोकों/२४२७ देविदास पळसे, पोकों/ ७५४ कुलदिप घोळवे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे अजित लालासाहेब उबाळे यास त्याचे जवळील गावठी कटटयासह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे साो, अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें साो, अहिल्यानगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री प्रविणचंद्र लोखंडे साो, कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दशरथ चौधरी, सपोनि श्री नंदकुमार सोनवलकर, पोकों/२४२७ देविदास पळसे, पोकों/ ७५४ कुलदिप घोळवे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकों / नितीन शिंदे यांनी केली आहे.


0 टिप्पण्या