TET बाबत राज्य शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू याचिका लवकरच दाखल करणार*श
नागपूर येथे डॉ.पंकज भोयर शालेय शिक्षण राज्य मंत्री सोबतच्या सभेत सकारात्मक चर्चा..
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : दिनांक 4 ऑक्टोबर रोजी नागपुर येथे डॉ.पंकज भोयर शालेय शिक्षण राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत सर्व शिक्षक संघटनांची TET व अन्य विषयावर सभा संपन्न झाली.
सर्व संघटनेनी मांडलेल्या मुद्यांचा स्वीकार करत मुख्यमंत्री महोदयांशी या विषयावर चर्चा करून या ठिकाणी शासनाचे मत व्यक्त करत आहोत, असे सांगत राज्य शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू याचिका लवकरच दाखल करण्यात येईल, त्याची प्रोसेस सुरू करत आहोत असे आश्वासन दिले. राज्यातील पूरपरिस्थिती व झालेले नुकसान पाहता मोर्चा करू नये असे आवाहन .मंत्री महोदयांनी संघटनांना केले त्याला प्रतिसाद देत दिनांक 4 ऑक्टोबरचा मोर्चा संस्थगित करत आहोत असे संघटनेने जाहीर केले. यानंतर संघटनांनी सभा घेत 18 ऑक्टोबर पर्यंतचा अवधी शासनाला देण्याचे ठरवले, या कालावधीत TET बाबत कार्यवाही न झाल्यास, त्यानंतर शिक्षकांचे विविध टप्यात आंदोलन सुरू होईल व 8 नोव्हेंबर रोजी राज्यभर मोर्चे काढण्यात येईल असे ठरवण्यात आले.
यासोबतच 15 मार्च संचमान्यता शासन निर्णयात दुरुस्ती करण्याची सहमती देऊन शिक्षणसेवक, अनुकंपा, BLO व अन्य विषयावर सुद्धा सकारात्मक चर्चा झाली व याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
एकंदरीत आजची सभा व चर्चा यशस्वी झाली.
सर्व शिक्षक संघटनांचे व्यासपीठ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन होणार होते.
सभेला राज्य संघटनेचे केशवराव जाधव, विजय कोंबे, निसार अहमद यांचेसह राज्यातील प्राथमिक व माध्यमिक संघटनांचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते. पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने हरीश ससनकर राज्य सरचिटणीस, डॉ अलका ठाकरे महिला राज्याध्यक्ष, लीलाधर सोनवणे नागपूर अध्यक्ष उपस्थित होते. व या विषयावर मत मांडले.


0 टिप्पण्या