चंद्रपूरच्या न्यायदंडाधिकारी सरवरी यांच्याविरोधात अवमानना अर्ज; हायकोर्टात तक्रार दाखल
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर: स्वतःच्याच विरोधात न्यायालयीन अवमानना अर्ज दाखल झाल्यानंतरही संबंधित प्रकरणात अंतिम आदेश पारित केल्याचा गंभीर आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्यू. ए. एन. सरवरी यांच्यावर करण्यात आला आहे.
मिलिंदकुमार रामाजी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासह कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार दाखल केली आहे. पाटील यांच्याविरोधात 'गृह हिंसाचार प्रतिबंधक कायदा' अंतर्गत मुल न्यायालयात खटला प्रलंबित आहे.
वकिलाचा आरोप:
पाटील यांच्या वकिलांचा दावा आहे की, या प्रकरणात पुराव्याची प्रक्रिया पूर्ण न होता, अंतिम युक्तिवाद न ऐकता आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज विचारात न घेता न्यायाधीश सरवरी यांनी एकतर्फी अंतिम आदेश पारित केला.
अवमानना अर्ज आणि त्याच दिवशी आदेश: त्यामुळे पाटील यांनी दि. 8 जून रोजी न्यायाधीश सरवरी यांच्या विरोधात न्यायालयीन अवमानना कायदा, 1971 अंतर्गत फौजदारी अवमानना अर्ज तयार करून दि. 9 जून रोजी ई-मेल व सी-आयएस प्रणालीद्वारे न्यायालयात दाखल केला.
मात्र, त्याच दिवशी संबंधित न्यायाधीशांनी अंमलबजावणी प्रकरणात आदेश पारित करून पाटील यांच्याविरोधात एकतर्फी कारवाई केल्याची तक्रार विशेष नमूद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित आदेशाबद्दलच न्यायाधीशाविरुद्ध अवमानना अर्ज दाखल करण्यात आला आहे. याबाबत न्यायाधिश सरवरी यांचे कडून माहिती घेण्याकरीता संपर्क होऊ शकला नाही.
-----------------------------------------------------
न्यायालयीन खळबळ: अवमानना अर्ज दाखल होऊनही न्यायाधीशांनी दिला अंतिम आदेश!
चंद्रपूरच्या मुल येथील न्यायदंडाधिकारी क्यू. ए. एन. सरवरी यांच्यावर गंभीर आरोप. गृह हिंसाचार प्रकरणात पुरावा, युक्तिवाद पूर्ण होण्याआधीच एकतर्फी निकाल. त्याच दिवशी वकिलाने अवमानना अर्ज दाखल केला, त्याच दिवशी न्यायाधीशांनी अंमलबजावणीचा आदेश काढला. प्रकरण हायकोर्टात


0 टिप्पण्या