चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणीच्या विदर्भ दौऱ्यानिमित्त शनिवारी भद्रावती येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, राज्य कार्यकारी सदस्य चंद्रकांत डागा, विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ प्रांत सचिव लिलाधर लोहरे तसेच कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी ग्राहक हक्क, ग्राहक जागरूकता आणि संघटनेच्या कार्याची दिशा यावर समयोचित मार्गदर्शन केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही ग्राहकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी आणि न्याय मिळवून देणारी संघटना असून राज्य कार्यकारिणीच्या या दौऱ्यात भद्रावती शाखेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या भद्रावती शाखेने अल्पावधीतच अनेक ग्राहकांच्या तक्रारींची यशस्वी सोडवणूक करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. शाखेच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भद्रावती शाखेचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती चे अध्यक्ष, प्रवीण चिमुरकर, सचिव वतन लोणे, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, सहसचिव करुणा मोघे, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, संघटक सोनल वावरे तर सदस्य विनोद ठमके, गुरुदेव बावणे, रवी भांडारकर, नामदेव रामटेके आणि प्रतिक्षा बनकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन वतन लोणे यांनी केले, प्रास्ताविक प्रवीण चिमुरकर यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. या कार्यक्रमामुळे ग्राहक चळवळीला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


0 टिप्पण्या