Ticker

6/recent/ticker-posts

मालुटोला गोहत्या प्रकरणी चौकशी करा

            तक्रारदारांचे निवेदन  


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 साकोली : तालुक्यातील मालुटोला येथे ( मंगळ. ०३ जून ) ला संशयित आरोपीच्या शेतात गाईची हत्या करून कुणीतरी अवशेष फेकले. ही बाब ग्रामस्थांना माहिती होताच त्यांनी साकोली पोलीसांत संशयित आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर याची पूर्णपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करा असे निवेदन तक्रारदारांनी ( गुरूवार ०५ जून ) ला आमदार नाना पटोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे व पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांना निवेदन दिले आहे. मालुटोला शेतशिवारात ०३ जूनला रात्री ८ दरम्यान यातील संशयित आरोपीने गाईची हत्या करून त्याचे अवशेष गोवंश जातीचे मास, मान, धड, कातडी, शिंगे, सांगाडा आणून टाकला. याची तक्रार ०४ जूनला पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली. तक्रारदार निखिलेश राहंगडाले रा. मालुटोला यांच्या तक्रारीत नमूद असे की, संशयित आरोपी रामु मेश्राम वय ५० वर्ष रा. भिवसनटोला / जांभळी यांची कब्जा केलेली शेती आहे व तो गावात जनावर कापत असतो. ०३ जूनला रात्री ०७:३० दरम्यान गावातील उपसरपंच दिनेश कटरे यांनी फोनद्वारे माहीती दिली की, मालुटोला गावामध्ये गाईला शेतात कापुन फेकले. त्यानंतर मी गावात चौकशी करून गावातील काही मुलांना गोळा करून रात्री १०:३० ला रामु मेश्राम यांच्या शेतावर जाऊन पाहीलो असता पांढ-या रंगाची गाय तिचे बिल्ला क्र. १०३४४८१५५०६३ असा असुन गाईचे मान, धड वेगवेगळी झालेली आहे असे दिसल्याने मी राकेश ब्राम्हणकर रा. सौदड यांना फोन द्वारे माहीती दिली. व ते सुध्दा मालुटोला येथे रामु मेश्राम यांच्या शेतामध्ये येवुन पाहीणी केली. सदर गाय ही संशयित आरोपी रामु मेश्राम यांनी कब्जा असलेल्या शेतीत कापुन फेकला असावा असा माझा संशय आहे. तरी त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करिता पोलीस स्टेशन साकोली येथे तक्रार देत आहे. यावर पोलीसांनी संशयित आरोपींविरुद्ध कलम ३२५, भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ५ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे. या गंभीर प्रकरनाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस नायक अजित वाहणे व चमु करीत आहेत..या संतापजनक प्रकारावर ०४ जूनला याची चौकशी होऊन संशयित आरोपींविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी तक्रारदार निखिलेश रहांगडाले व पत्रकार राकेश ब्राह्मणकर यांनी आमदार नाना पटोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांना निवेदन सुद्धा सादर केले आहे. याविरोधात साकोलीत मालुटोला गोहत्या प्रकरणी शनिवार ०६ जूनला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी तसेच गोभक्त बांधवांनी याचा तीव्र निषेध करून पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या