लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड मो 9689821132
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील पोटा कामारी जिल्हा परिषद गन ओपन साठी राखीव करण्यात आला आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे विश्वासू दीपक पाटील वडगावकर शिवसेना उ.भा.ठा. तालुका उपाध्यक्ष हे या मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे सांगितले आहे. या गणातून उमेदवारासाठी दीपक चव्हाण यांचे नाव जोरात चर्चेत आहे शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे स्थानिक भागात पक्ष मजबूत करण्यासाठी सामाजिक व राजकीय कार्यासाठी दीपक चव्हाण हे परिचित आहेत स्थानिक नागरिकांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की दीपक चव्हाण यांची उमेदवारी शिवसेना उ.भा.टा. पक्षाकडून कामाच्या माध्यमातून निश्चित मानली जात आहे .यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात उत्सुकता आणि गती निर्माण झाली आहे स्थानिक जनता कार्यकर्ते आणि मतदार आता आगामी निवडणुकीसाठी सुरू होणाऱ्या तयारीकडे लक्ष देत आहेत तर चर्चेत उमेदवाराची लोकप्रियता पक्षाची ताकद आणि मतदारांचा प्रतिसाद याबाबत विविध चर्चा जोरात सुरू आहेत खासदार साहेब यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून हिमायतनगर तालुक्यात त्यांची ख्याती आहे. शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ ते आहेत म्हणून त्या गणातील जनतेचे म्हणणे लक्षात घेऊन खासदार साहेब दीपक चव्हाण यांना निवडणूक लढवण्याची संधी देतील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


0 टिप्पण्या