Ticker

6/recent/ticker-posts

शरद पौर्णिमेच्या शीतल चांदणीत योगसाधकांनी आनंदात साजरी केली कोजागिरी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-गणेश मंदिर (एमएसईबी कॉलनी) येथील मंदिर प्रांगणात नुकतेच कोजागिरी  योगसाधकांनी शरद पूर्णीमेच्या शीतल चांदणीत आनंदात  साजरी केली.या प्रसंगी विशेष पाहुणे म्हणून स्थानिक आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांची उपस्थिती होती.
प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे यांच्या कुशल नेतृत्वात शांततेने आयोजित कार्यक्रम प्रसंगी सुरुवातीला आमदार भोंडेकर यांनी गणेश मंदिरात पुजा केली.इंदुबाई भुरे, वर्षा बिसेन यांनी भुलाबाईचे गाणी सादर केल्या. प्रसंगी श्री गणेश मंदिर चे अध्यक्ष माजी नगरसेवक ,सचिव मधुकर गभने व इतर सदस्य हजर होते.पतंजली योग समिती( संभाजी योग उद्यान, मिस्किन गार्डन) च्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ बालकृष्ण सार्वे,दीपक गजभिये, तुळजाभवानी योग  समिती  चे मारुती पुडके,यशवंत बीरे,सामा.कार्यकर्ते रुपेश टांगले,चींधूजी बुद्ध्दे ,बबन इश्वरकर ,सदानंद इलमे, के.झेड शेंडे,आत्माराम बेदरकर,अतुल वर्मा,सईद शेख,अरुण गावंडे,हरिभाऊ थोटे,अनिल शेंडे ,ललित बिसेन, प्रभुदास पराते,राधा गुप्ता,लता मते,रेखा वासनिक,प्रभाकर तीतिरमारे,पुरुषोत्तम वैद्य,शिवराम बारई,अरविंद बांते,पुरुषोत्तम समरीत,अनिल वैद्य,राजेंद्र देशमुख,संजय मोहतुरे, प्रभु मडावी,शाम सार्वे,पुरुषोत्तम साकुरे,अशोक साकुरे,शाम सार्वे,रामेश्वर येळणे ई योग साधक व साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार भोंडेकर यांनी पटांगण मध्ये योग समितीचे योग साधकांकरिता शेड ची व्यवस्था दिवाळी नंतर करून देण्याचे आश्वासन दिले.गीत_संगीताने कार्यक्रमात रंगत आणली,अनेक वरिष्ठ योगसाधकानी शरद पौर्णिमेचे  महत्व विषद केले.
सूत्र संचालन अतुल वर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर गभने यांनी. कार्यक्रम पश्चात चविष्ट बासुंदी व जेवणाचा सर्वांनीआस्वाद घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या