चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-शासनाच्या पोषण अभियान अंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प(नागरी) भंडारा च्या वतीने पालक मेळावा जिजामाता सांस्कृतिक मैदान, भृशुंड गणेश मंदिर मेंढा रस्ता येथे नुकतेच पार पडले.महिला व बाल विकास विभाग च्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक दत्तात्रय मुंडे उपायुक्त महीला व बाल विकास विभाग नागपूर होते तर अध्यक्ष म्हणून संजय जोल्हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल विकास अधिकारी जिला परिषद भंडारा,प्रमुख पाहुणे म्हणून नितीन मोहूर्ले बाल विकास प्रकल्प अधिकारी(नागरी)भंडारा ,श्रीमती दामिनी भिवगडे आहारतज्ञ (NRC) , ग्रीन हेरिटेज चे सईद शेख,माजी नगरसेविका भूमेश्वरी बोरकर,रंजीत कुर्हे ,स्नेहल शहारे(ई _आकार), ई सह मोठ्या प्रमाणात सर्व सेविका,मदतनीस ,पालकांची आवर्जून उपस्थिती होती.कार्यक्रमात महिला व बालकांसाठी पोषण व संतुलित आहाराचे महत्त्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले.लहान मुलांमध्ये कुपोषण,गर्भवती महिलांसाठी योग्य आहार, मुलाकरिता नियमित तपासणी बाबत माहिती देण्यात आली.प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे उपायुक्त दत्तात्रय मुंडे यांचे हस्ते फीत कापून अंगणवाडी सेविका व मदतनीस तर्फे पोषण अभियान चे विविध आहार व आरोग्य बाबत प्रात्यक्षिक स्टॉल चे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्तविक करतांना नितीन मोहुर्ले यांनी मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची आहे,बालकांच्या आहार पध्दतीचा वापर कसा करायचा ,पौष्टिक आहार कसे तयार करावे यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे मार्गदर्शनातून सांगितले.संजय जोल्हे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे मुख्य *संदेश निरोगी मां_निरोगी बच्चा* प्रमाणे पोषण आहार अभियान यशस्वी पणे राबवायचे आहे असे प्रतिपादन केले.रंजीत कुऱ्हे यांनी जिवणाकरिता पाणी,स्वच्छता,आरोग्य,सकस आहार व दैनंदित जीवनाचे आहाराबाबत मार्गदर्शन केले. उद्घाटक दत्तात्रेय मुंडे यांनी अंगणवाडी सेविका,मदतनीस यांना तुम्ही काम करता,पण श्रेय घेत नाही,श्रेय आम्ही घेतो म्हणून खरे सत्कारमूर्ती तुम्हीच आहात असे प्रतिपादन करून माता व बालकांना योग्य ते पोषण, सकस आहार मिळावा व ते सदैव निरोगी जीवन जगावे याकरिता आपण सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले. आहारतज्ञ श्रीमती दामिनी भिवगडे,स्नेहल शहारे यांनी ही आहारावर मार्गदर्शन केले.नृत्य व अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.सूत्र संचालन जयनंदना कांबळे,मनीषा गणवीर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुपरवाइजर रचना गहेरवार,योगिता पद्मशाली ,यशस्वी चिरवतकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी मनीषा गणवीर,जयनंदना कांबळे, विजया काळे,सारिका शहारे,आरती सार्वे,ज्योती राजगिरे,लता वंजारी,सुनंदा ठाकरे,कीर्ती रगडे,वैशाली भोंदे,विद्या,मीनल मालोडे, आँचल भोयर,स्नेहा धारगावे, तथा सर्व सेविका, मदतनीस ई नी सहकार्य केले.हे अभियान मुले ,माता यांच्या आरोग्य व पोषण प्रति जागरूकता वाढीस मोलाचे सिद्ध झाले.


0 टिप्पण्या