चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भद्रावती तालुकाप्रमुख पदी नंदू म.पढाल( आपला माणूस ) व शहर प्रमुख पदी घनश्याम शा. आस्वले यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख भास्कर जाधव साहेब आणि चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हा प्रमुख भास्कर भाऊ ताजने यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ( नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती ) डोळ्यासमोर ठेवून नंदू म. पढाल( आपला माणूस) माजी नगरसेवक नगरपरिषद भद्रावती तथा उपाध्यक्ष विदर्भ विभागीय सहकारी संघ नागपूर यांची चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुका प्रमुख या पदावर तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली तसेच श्री घनश्याम आस्वले यांची सुद्धा भद्रावती शहराच्या शहर प्रमुख पदी तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली नवीन कार्यकारणी मध्ये तालुका संघटक सचिन - डुकरे, तालुका समन्वयक - रविकांत राय, शहर प्रमुख - घनश्याम आस्वले, शहर संघटक - बंडू चटपल्लीवार, शहर समन्वयक - सुयोग भोयर, यांचा समावेश आहे.
सदर नियुक्त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुखपृष्ठ दैनिक सामना या वृत्तपत्रातून दिनांक 16 ऑक्टोबर 2025 ला प्रकाशित करून देण्यात आल्या. या फेर पदनियुक्त्यांमुळे भद्रावती तालुक्यातील व शहरातील सर्वच शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक व जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून संपूर्ण जिल्ह्यातून यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


0 टिप्पण्या