चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर :-तालुक्यातील निडेबन अंगणवाडी क्रमांक एक, दोन, तीन, चार व पाच येथे राष्ट्रीय पोषण महा २०२५ पोषण अभियान संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलवानेत झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क अभियान मराठवाडा प्रसिद्धीप्रमुख अर्जुनराव जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथक प्रमुख तथा वाहतूक पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनाली ढगे, महाराष्ट्र शासननियुक्त शासकीय सदस्य तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, बचत गटाच्या सीआरपीओ सौ.कविता राठोड, सेवानिवृत्त जेष्ठ कार्यकर्ते व्यंकटराव कोदळिकर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक उदगीर शहर पोलीस ठाण्यातील दामिनी पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल सोनाली ढगे यांनी दामिनी पथकाची नियुक्ती संदर्भातील कामे व कार्ये संदर्भात, बॅड टच आणि गुड टच संदर्भातही मार्गदर्शन केले. तसेच दलित मित्र बालासाहेब शिंदे यांनी सक्षम अंगणवाडी आणि पोशन २.० हे एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रमांची रूपरेषा सांगितले. तसेच पोषण सहाय्य कार्यक्रमा मध्ये मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमधील कुपोषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जातो. आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पद्धती विकसित आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक अभिसरण इको सिस्टीमच्या निर्माण करणे हा पोषण सहाय्य कार्यक्रम चा उद्धेश असल्याने ह्यांचे लाभार्थी मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनंदा माता पोषण २.० ची उद्दिष्टे अंगणवाडी सेवा अंतर्गत पूरक पोषण कार्यक्रम किशोरवयीन मुलीसाठी योजना आणि पोषण अभियान हे एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम म्हणून पोषण २.० अंतर्गत असल्याचे सांगितले. यावेळी अंगणवाडी क्रमांक एकच्या कार्यकर्ती चंचला शिवाजीराव हुगे, मदतनीस उषा नामेवार, अंगणवाडी क्रमांक दोनच्या कार्यकर्ती सुमनबाई देवनाळे, मदतनीस पूजा चिलकलवार, अंगणवाडी क्रमांक तीनच्या कार्यकर्ती ज्योती लक्ष्मण करकरे-खादीवाले, मदतनीस संगीता कांबळे तसेच अंगणवाडी क्रमांक चारच्या कार्यकर्ती विजया चौधरी, मदतनीस वनमाला भालेराव, अंगणवाडी क्रमांक पाचच्या कार्यकर्ती शोभा साळुंके, मदतनीस महादेवी वैजनाथ हाळ्ळे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष असे परिश्रम घेतले. यावेळी गरोदर मातांची पोषण आहाराने ओटी भरण्यात आली. तर सहा महिन्यांच्या बाळाला आहार पाषाण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्यकर्ती चंचला शिवाजीराव हुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती करकरे यांनी मानले.


0 टिप्पण्या