Ticker

6/recent/ticker-posts

विंचरणा नदी लगत अमरधाम ते भुतवडा रोडवरील व्यसनाधीश व रोडरोमीओंचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करणार:- बापूसाहेब गायकवाड...


सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड:- आज पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना भिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने श्री बापूसाहेब गायकवाड यांनी निवेदन दिले व आंदोलनाचा इशारा दिला.
         तपनेश्वर येथील अमरधाम रोड ते भुतवडा रोड पर्यंत विंचरणा नदीकाठचा रस्ता असून या रस्त्याला भुतवडा व लेहनेवाडी येथील विद्यार्थीनी ये-जा करत असतात तसेच जेष्ठ नागरीक व महिला शतपावली करणेसाठी येतात. परंतू या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना व विद्यार्थीना पाहून द्विअर्थ शब्द वापरून गलिच्छ प्रकारचे हातवारे व वर्तन करतात. तसेच व्यसनाधिनांचे टोळके हे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान करतात तसेच रस्त्याच्या कडेने दारूच्या बाटल्याचा खच पडलेल्या आहे.  त्यारस्त्याने कोणत्याही प्रकारची शांतता व सुव्यवस्था राहिलेली नाही.
      तरी ही साहेबांस विनंती आहे की, या रस्त्याने सायं. ६ वा. नंतर व दिवसासुद्धा महिला ये-जा करू शकत नाही. एवढी दहशत वेगवेगळ्या भागातील टवाळखोर व व्यसनाधिश रोडरोमिओची आहे, तरी यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. असे न झाल्यास नागरीकां समवेत तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाचे दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या