निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देऊ : तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई
चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा :-दलित आणि वंचित, बहुजन घटकांच्या तसेच सर्व सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढणारी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना आता महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेणार आहे. संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई यांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष कुणाल माने यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील सर्व राखीव जागांसाठी जोरदार लढा दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी तात्काळ तयारी सुरू करण्याचे आवाहन करून कुणाल माने यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये राखीव असलेल्या सर्व जागांवर तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे उमेदवार उभे केले जातील, असे कुणाल माने यांनी स्पष्ट केले. वंचित समाजाच्या हक्कांसाठी आम्ही राजकीय पटावर मजबूत उपस्थिती नोंदवणार आहोत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता तयारीला लागावे, असे ते म्हणाले. तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना ही आंबेडकरी चळवळीच्या वारसावर उभी असलेली संघटना असून, संदिपभाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली ती देशभर कार्यरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यात कार्यरत आसलेले कार्यकर्ते याबाबत उत्साही असून, लवकरच रणनीती ठरविण्याबाबत महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यामध्ये आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. असे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई व कुणाल माने यांनी सांगितले आहे, या निर्णयामुळे मेहकर येथील स्थानिक राजकारणात नवीन चढाओढ निर्माण होण्याची शक्यता आहे.


0 टिप्पण्या