चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथे नुकताच महाराष्ट्र राज्य क्रिडा संचालनालय पुणे विभागीय क्रिडा अधिकारी नागपूर तथा जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपुरच्या संयुक्त विद्यमाने बॉक्सिंग विभागीय शालेय क्रिडा स्पर्धा येथील तालुका क्रिडा संकुलात आयोजित केली होती. या स्पर्धेत भद्रावती येथील नाभिक समाजातील विधाता बंडू लांडगे यांनी नागपूर विभागात अव्वल स्थान प्राप्त केल्याची त्याची निवड राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी झाल्याबद्दल स्थानिक भद्रावती येथील नुकताच पार पडलेल्या श्री. संत नाराजी महाराज पुण्यतिथी निमित्त पुण्यतिथी महोत्सव समिती तर्फे विधाता लांडगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.निवृत्ती पिस्तुलकर, से. नि. प्राचार्या आर्णी, प्रमुख पाहुणे समिर वाटेकर मंडळ अधिकारी तहसील कार्यालय भद्रावती, ऑड. सुनील नामोजवार भाजपा शहर अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, प्रभु सेवा संस्था अध्यक्ष रमेश हणुमंते चंद्रपुर, ज्योतिताई लांडगे उपस्थित होते.
विभागस्तरीय बॉक्सिंग क्रिडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे महाविद्यालयतील १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या बॉक्सिंग क्रिडा प्राकारात त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करीत नागपूर विभागात अव्वल ठरला आता तो राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रिडा स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.या निमित्ताने विधात बंडु लांडगे श्री. संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवा समितीचे वतीने व सर्व समाज बांधवांनी पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले.


0 टिप्पण्या