आपल्या नाभिक समाजाने व्यवसायात बद्दल करायला पाहिजे --- डॉ. निवृत्ती पिस्तुलकर
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथील स्थानिक श्री. संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती भद्रावतीच्या वतीने श्री. संत नगाजी महाराज देवस्थान नगाजी नगर येथे झालेल्या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध कार्यक्रमाने उत्तम रित्या पार पडला
आपल्या नाभिक समाजाच्या व्यवसायात बद्दल करायला पाहिजे आपला समाज वाद करण्यात वेळ वाया घालवत आहे. कधी रेट साठी वाद, कधी शाखा साठी वाद तर कधी संघटने करीता वाद हा वाद कुठे तरी थांबायला पाहिजे जग कुठे चाललंय आपण कुठे चाललो यावर विचार करायला पाहिजे असे अध्यक्षीय स्थावरुन बोलताना डॉ. निवृत्ती पिस्तुलकर से. नी. प्राचार्य आर्णी यांनी समाजाची खंत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. निवृत्ती पिस्तुलकर से.नि. प्राचार्य आर्णी पि एच डी विदर्भातील नाभिक व्यवसायाचे आर्थिक अध्ययन, प्रमुख पाहुणे समीर वाटेकर मंडळ अधिकारी तहसील कार्यालय भद्रावती, ऑड. सुनील नामोजवार भाजपा शहर अध्यक्ष भद्रावती, माजी उपनगराध्यक्ष प्रप्पुल चटकी भद्रावती, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, प्रभु सेवा संस्था अध्यक्ष रमेश हणुमंते चंद्रपुर, ज्योतीताई लांडगे माजरी, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जाहीर किर्तनकार कु. जान्हवीताई घुमे नागपूर यांनी आपल्या सप्त खंजरीच्या माध्यमातुन उपस्थितांचे मनोरंजनाने समाज प्रबोधन केले.
या दोन दिवसीय कार्यक्रमात श्री ची घटस्थापणा, पुजा आरती, महीला व मुलीकरीता विविध स्पर्धा,सांस्कृतिक, महिला संमेलन, आनंद मेळावा (पाककला), गुणवंत विध्यार्थ्यांना पारीतोषीक देण्यात आले. विषेश करुन नाभिक समाजातील बॉक्सींग चाँपियन विजेता विधाता लांडगे यांचा सत्कार करण्यात आला,भजन किर्तन,पारायण, पालखी सोहळा व भव्य शोभायात्रा यामध्ये श्री संत नगाजी महाराज व श्रीसंत सेनाजी महाराज यांची प्रतीमेची प्रतीकृती सादर करण्यात आले.मोठ्या संख्येने महीला, पुरुष व लहान मुलांचाही सहभाग होता.
सायंकाळी महाप्रसाद प्रसादाचे वितरण करण्यात आले.यानंतर आर्केस्ट्रा सुगम संगीत भावगीत, भक्तिगीत सुमनाने उपस्थाताचे मंत्रमुक्त केले.
कार्यक्रम यशस्वीते करीता अध्यक्ष रविंद्र हणुमंते, कार्याध्यक्ष हरीश घुमे , सचिव सचिन नक्षिणे, उपाध्यक्ष सुरेशराव जमदाडे, कोषाध्यक्ष पांडुरंग हणुमंते, सहसचिव जितेंद्र नागतुरे, सतिश मांडवकर,सुधीर लांडगे,सागर घुमे, महिला अध्यक्ष छायाताई जमदाडे, कार्याध्यक्ष रागीणी सुत्रपवार, सचिव मोनालीताई जांभुळकर, उपाध्यक्ष शालिनीताई शेंडे, कोषाध्यक्ष भुवनेश्वरी निंबाळकर, सचिव सविता लांडगे, मायाताई चिंचोलकर, शोभाताई लांडगे नंदिनी लांडगे,वर्षाताई वाटेकर, जयश्री नक्षिणे, मनिषा नक्षिणे, बंडू व्हि. लांडगे, देवेंद्र नागपुरे, पियुष घुमे, हणुमान नक्षिणे, विजय मेश्राम,नंदु नाक्षिणे, गणेश दैवलकर, सचिन माडवकर, प्रशांत नक्षिणे, मंगेश वाटेकर, गोपाल आसकर, राजु वाटेकर (किलोनी), राहुल दैवलकर आदीनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश घुमे,सुत्र संचालन संकेत जमदाडे यांनी तर उपस्थितांचे आभार रविंद्र हणुमंते यांनी मानले.


0 टिप्पण्या