भिमगितांचा सदाबहार कार्यक्रम व भोजनदान !
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चंद्रपूरच्या वतीने येत्या १५व १६ तारखेला ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर संध्याकाळी ५ वाजता भिमगितांचा सदाबहार कार्यक्रम व भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
दरम्यान १६ तारखेला दीक्षाभूमीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक केन्द्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
(भारत सरकार नवी दिल्ली)हे असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे हे विभूषित करणार आहे.
सदरहू कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी वनमंत्री बल्हारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार,राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, विदर्भ प्रदेश महासचिव अशोक घोटेकर,व महिला जिल्हाध्यक्षा किरण गेडाम प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
उपरोक्त दोन दिवशीय कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विनोद वानखेडे, केशवराव रामटेके, हंसराज वनकर, महानगर महासचिव संदीप जंगम,शैलेश राखडे, महानगर उपाध्यक्ष शरद वनकर,मूल तालुका अध्यक्ष विकास रामटेके, पोंभूर्णा महिला आघाडी अध्यक्ष जयमाला उराडे, कोरपना तालुका महासचिव गौतम धोटे, उपाध्यक्ष गौतम भसारकर,नागभिड तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खोब्रागडे, कोरपना तालुकाध्यक्ष प्रभाकर खाडे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.


0 टिप्पण्या