Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीच्या बसस्थानकात सोयी-सुविधांची मारामारी..!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:-बहूजण हिताय,बहूजण सुखाय हे वाक्य फक्त भींतीवर व बॅनरवरच उठावून दिसते.
कारण,उदगीर तालुक्यातील हाळी- हंडरगुळी येथील बसस्थानकामधील संबंधित प्रशासनाने निर्माण केलेल्या विविध समस्या पाहता बहूजण हिताय,बहूजण सुखाय असे लिहण्या ऐवजी बहूजण दु:खाय,बहूजण रडाय..! असेच लिहलेले पाहीजे. असा सुर या बसस्थानकातील अनेक गैरसोयी व समस्या याकडे बघून प्रवाशी जनतेतून निघत आहे.
हाळीत बसस्थानक सुरु झाले.तेंव्हा पासूनच प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात महामंडळाने एकही सुविधा उप्लब्ध केली नाही.म्हणुन या बसस्थानकात येणा-या स्थानिक व बाहेर गावातील हजारो प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.तसेच हे बसस्थानक या भागातील प्रवाशांच्या सेवेऐवजी गैर सोयीचे स्थानक बनल्याचे दिसते.
स्थानकात पाणी,शौचालय,कॅमेरे व कॅन्टींन या सुविधा उप्लब्ध करायचे नाही.असा पण एस.टी.महामंडळाचे संबंधित अधिका-याने केला आहे की काय?असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
कारण,या बसस्थानकात प्रवाशांच्या हिताची एकही सुविधा दिसत नाही. तसेच याची माहिती असून व देऊन सुध्दा संबंधित अधिकारी याकडे जाणुन-बुजून दुर्लक्ष करत आहेत.
तसेच अधिका-यासह स्थानिक स्वयं घोषित पुढा-यांनाही या बसस्थानका मध्ये प्रवाशांकरीता सोयी-सुविधा उप्लब्ध करुन द्याव्यात.असे वाटेना.. 
या बसस्थानकातून महाराष्ट्रातील उदगीर,नांदेड,अहमदपुर,चाकुर, संभाजीनगर,बीड,हिंगोली,शिर्डी तसेच कर्नाटकातील बिदर,कलबुर्गी, हुमनाबाद आदी ठिकाणी आराम- निमआराम,जलद,अतिजलद एसटी. बसेस ये- जा करत असल्याने या बसस्थानकामध्ये हंडरगुळी परिसरातील रुद्रवाडी खरबवाडी, आनंदवाडी,अढळवाडी,मोर्तळवाडी,चिमाचीवाडी,वंजरवाडी या व अन्य गावच्या प्रवाशांची दररोज तोबा गर्दी असते.आणि याच गर्दीचा फायदा पाकीटमार घेऊ शकतात.! म्हणुन येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व अन्य सुविधा उप्लब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे.

या बसस्थानकात चांगल्या सुविधा दिसत नसल्यातरीही दारुड्यांसाठी माञ चांगली सोय झाल्याने दिवसा ढवळ्या बसस्थानकात अनेकजण "तीर्थ" प्राशन (दारु) करत असलेचे सामान्य जनतेसह प्रवाशी व याच बसस्थानकातील वाहतूक नियंञका -ला दिसते.तरीही "तीर्थ" (दारु) पित असलेल्यांना हटकायची डेअरींग वाहतूक नियंञक का दाखवत नाही.
असा प्रश्न एका महिला प्रवाशानी नाव गुप्त ठेवायच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अधिका-यास विचारला आहे.
या बसस्थानकातून दररोज शेकडो विद्यार्थींनी शिक्षणासाठी उदगीर, शिरुर,अहमदपुर येथे ये-जा करत असतात.तसेच महिलावर्ग पण येथून प्रवास करतात.तेंव्हा विद्यार्थीनींसह महिला प्रवाशांना कांही झालेच तर जबाबदार कोण?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या