Ticker

6/recent/ticker-posts

बोरगडी सज्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी )यांचा मनमानी कारभार....

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकर्यांची क्षेत्र कमी टाकुन महसुल अधिकारी यांची शेतकर्यांनाच हुकुमशाही ची भाषा......


लिंगोजी कदम :- जिल्हा प्रतिनिधी ग्रामिण नांदेड :- मो :- 9689821132 

नांदेड :-हिमायतनगर तालुक्यात  अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकर्यांचे बेहाल झाले. आसतांना बोरगडी सज्यातील  ग्राम महसूल अधिकारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कार्ला पि. बोरगडी, व सिबदरा या गावातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाई क्षेत्र तलाठी नाल्या काठच्या खरडून नुकसान झालेल्या जमीनीची आनेवारी कमी दाखवून शेतकर्यांची थट्टा करण्याचे काम केले आहे. तसेच शासनाने दिलेल्या क्षेत्रापेक्षाही कमी क्षेत्र दाखवत हुकुमशाही केल्याने शेतकरी यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. ९ ओक्टोंबर रोजी तहसिलदार यांच्या कडे कार्ला पि येथील शेतकर्यांनी महसुल अधिकारी यांच्यावर कारवाई करुन निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी सरपंच गजानन कदम, डॉ गफार कार्लेकर तंटामुक्ती अध्यक्ष,संजय काईतवाड शिव सेना संघटन, तुकाराम कदम, अक्षय मोरे, निळकंठ मोरे, सुदर्शन चव्हाण, अशोक आचमवाड, बालाजी कांबळे, नागसेन गोखले, कार्ला पि,बोरगडी,सिबदरा येथील शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या