चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : शहरात अति उत्साहात माॅं भवानी, माॅं शारदा व माॅं दुर्गाचा नऊ दिन का मेला सुहाना अति उत्साहात संपन्न झाला.शहरात पाचशेहुन अधिक ठिकानी "सार्वजनिक नवरात्रि उत्सव" साजरा करुन शहरातील बहुतेक महिला, युवती व बालिकांनी मनमुराद आनंद लुटला. शहरात संंपुर्ण वार्डातील मंडळांनी " महाप्रसाद" वाटप केला. शहरातील नामांकित देवी ठीकानी भवानी, वैष्णो देवी,चंडिका,अंबिका, महिशासुर मर्दीनी मंदीरात भव्य "महाप्रसाद" वाटप करण्यात आला.
येथिल व्यापाऱ्यांनी व दात्यांनी महाप्रसादाला सढळ हाताने मदत केली.नवरात्रि म्हटलं की दांडीया व गरबा महिला खेळल्या नाही तर नवरात्रि पुर्ण होवूच शकत नाही.या निमित्तानअनेक सेवाभावी संस्था दांडिया गरबा स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करत असते.या स्पर्धेला महिलांचे,युवक - युवतींचे अनेक ग्रुप भरभरुन प्रतिसाद देत असतात. शहरातील A B गरबा ग्रुप दरवर्षी विजयी होतच असते.विजयाची परंपरा A B ग्रुपने या ही वर्षी अबाधित ठेवली आहे. भद्रावती गरबा डांडिया उत्सव समिति भद्रावती Helping Hand ने नगर परिषद भद्रावती जवळ आयोजित स्पर्धेत ग्रुपने तृतीय क्रमांकाचे रुपये 777 /- रोख पारितोषक व प्रमाण पत्र प्राप्त करुन हा ग्रुप विजयाचा मानकरी ठरला.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या यशस्वी ग्रुपमधे तुजन खोब्रागडे, भूमिका खोब्रागडे,पलक बगडे,तरुण लांजेवार, प्रांजलि गणविर, कल्याणी खोब्रागडे, संकीसा हिवळे, श्वेता बदखल, अनुष्का बलकी,माही पारखी,युगा मानकर, आकांक्षा, विजय श्रिनीवास,गाथा पिंपळकर,हुमिका बेलेकर व गुंजन पाटिल यांचा सहभाग होता.
ईतर शहरात गरबा ग्रुप ला अनेक प्रायोजक (SPONSOR ) मिळतअसते. भद्रावतीच्या या A B गरबा ग्रुपचे दुर्देव आहे की, या ग्रुपला अजुनही कोणीही प्रायोजक मिळाले नाही. प्रायोजक मिळाल्यास हा ग्रुप नक्कीच भद्रावतीचे नांव चमकविणार असल्याचे या ग्रुपच्या संचालिका यांनी बोलुन दाखवले आहे.


0 टिप्पण्या