Ticker

6/recent/ticker-posts

एसबिआय बँके तर्फे विध्यार्थ्यांना पासबुकसह स्कूल बॅग वाटप


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : एसबीआय  बँके  तर्फे विद्यार्थ्यांना पासबुकसह स्कूल बॅग वाटप, विद्यार्थ्यांना बँकिंग सेवेचा अनुभव मिळाला भद्रावती शहरातील स्थानिक लोकमान्य विद्यालयात दिनांक 6 ऑक्टोंबर 2025 रोज सोमवारला सकाळी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भद्रावतीच्या ग्राहक सेवा केंद्राच्या संचालिका सौ सारिका संदीप इंगळे यांच्या पुढाकाराने व बँक व्यवस्थापक श्री धीरज येवले, बँकेचे सहाय्यक अधिकारी  फुलझले  यांच्या मार्गदर्शनात झिरो बँक बॅलेन्स खाते आधारित शिबिर राबविण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर योजनेसाठी झिरो बॅलेन्स  बँक खाते उघडून देण्यात आले यामुळे बँकिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर झाल्या व विद्यार्थ्यांनी बँकिंग सेवेचा अनुभव घेतला तसेच या शिबिरात विद्यार्थ्यांना बँक खात्यासोबत स्कूल बॅगचे सुद्धा वितरण करण्यात आले. 
याप्रसंगी लोकमान्य विद्यालयाचे अध्यक्ष  चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य  धारणे सर, विद्यालयातील संपूर्ण शिक्षक वृंद व संदीप इंगळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या