चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : भीम शाहीर प्रदीप कडबे. गोंदिया: तिरोडा तालुक्यातील चु र डी येते दिनांक-12/10/2025 रोज रविवारला स्थळ- गुरुदेव सेवा मंडळ चु र डी तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन केले, शाहीर दीनदयाळ मानकर यांची महाराष्ट्र शाहीर परिषद गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करून नियुक्ती पत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले, यावेळी महाराष्ट्र शाहीर परिषदेचे विदर्भ प्रमुख कार्यवाह - शाहीर बहाद्दुल्ला बराडे, विदर्भ उपप्रमुख शाहीर अरुण मेश्राम, विदर्भ संघटक प्रमुख भीम शाहीर प्रदीप कडबे, भंडारा जिल्हा अध्यक्ष शाहीर गणेश देशमुख, राजू कानसकर, अशोक टेंभुर्णीकर, ताराचंद सोनवणे, हिरालाल साठवणे, डोमाजी गिरीपुंजे, हिरालाल शेंडे, विनोद सूर्यवंशी, लक्ष्मण पटले, भोजराज डुंबरे, श्यामलाल मेश्राम, मधुकर फु टे, हिरामण किरणापुरे, धनराज चुटे, इत्यादी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, गावातील नागरिक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या