चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-मानवी जीवनाचे सार्वकालिक मूल्ये जपणारे तत्त्वज्ञान गीतेने जगाला दिले.भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे निमित्त करून मानवाला कर्मयोगाचे पियूष दिले आणि जगावर फार मोठा उपकार केला.
भगवत गीतेवर मराठी भाषेत पाहिले भाष्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केले.गीतेचे तत्त्वज्ञान एक किंचित ही न ढळू देता तत्वज्ञानाला काव्यात्मक रुप देवून ज्ञानाला भक्ती आणि कर्म यांची सांगड घालून भक्ती_पंथ सुगम आणि सुलभ केला.धर्मातील फाजील कर्मकांडां चे स्तोम दूर करून विशुध्द भक्ती तत्व सांगणारा वैष्णव संप्रदाय प्रस्थापित केला व विठ्ठलभक्ती रुजविली.
जात,धर्म,पंथ,स्त्री,पुरुष असा कुठलाही भेद न बाळगणारा व सर्वांना समान अधिकार प्रदान करणारा वैष्णव संप्रदाय आणि संप्रदायाची अत्यंत सोपी वाट समस्त आबाल _वृद्धांना खुली केली.
असे प्रा.सुमंत देशपांडे गीता आणि ज्ञानेश्वरी चे अंतिम व शेवटच्या प्रवचनात उद्बोधन करीत होते.ते भंडारा येथील शीतला माता मंदिर,खांबतलाव रोड येथे पाऊणे तीन वर्षांपासून शनिवार व बुधवार ला सकाळी 7.00 ते 8.00 वां.प्रा.सुमंत देशपांडे आणि डॉ.प्रकाश मालगावे हे सतत गीता आणि ज्ञानेश्वरी वर उद्बोधनात्मक प्रवचन करीत आहेत.या करिता उद्योजक रामविलास जी सारडा,माजी पोलीस अधीक्षक लोहित जी मतानी,राजकुमार जी सादिजा यांनी सर्वप्रथम प्रवचणाची सुरुवात केली. तुमसर येथे मागील पाऊणे दोन वर्षांपासून सतत दर सोमवारी प्रा.सुमंत देशपांडे आणि डॉ. प्रकाश मालगावे यांचे प्रवचन सुरू आहे.नागपूर येथे जिल्ह्याचे पूर्व न्यायाधीश समीर दास यांच्या नेतृत्वात नागपूर येथे सुद्धा दर गुरुवार ला सायं.7.00 ते रात्री 8.00 पर्यंत. डॉ प्रकाश मालगावें यांचे प्रवचन सुरू आहे. या इतक्या वर्षांच्या दरम्यान कसलेही खंड न पडू देता प्रा.देशपांडे आणि डॉ मालगावे यांनी एका दुसऱ्याच्या अनुपस्थित प्रवचनाची धुरा सांभाळली.हे विशेष.
भंडारा शहर येथील गीता,ज्ञानेश्वरी प्रवचनात मागील अडीच ते पाऊणे तीन वर्षांपासून रामविलास सारडा,लोहित मतानी( आता नागपूर ला) राजकुमार सादिजा, ईश्वरलाल जी काबरा,नीळकंठ रणदिवे सर,मोहन अग्रवाल,धनराज धूर्वे,वसंत कुर्वे,अतुल वर्मा,अंकुश हलमारे,कृष्णा कृपान ,हिरालाल लांजेवार,सेलोकर,भारद्वाज घुले,शाम कुकडे,रामेश्वर येळणे,भुरे व इतरांनी सातत्याने प्रवचनात हजर राहून प्रचनाचा अमृतलाभ घेतला.


0 टिप्पण्या