Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक 4 मधील सुज्ञ मतदारांनी आयात उमेदवाराला घरचा रस्ता दाखवावा :- विकी मुरलीधर सदाफुले...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098/9615179615

जामखेड :- आयात उमेदवाराला घरचा रस्ता दाखवून जनसेवक विकी सदाफुले यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन सर्वसामान्य कार्यकर्ते करत असून जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये या वेळी मतदारांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. प्रभागातील ताज्या घडामोडींमध्ये छताचा पंखा चिन्हावर शिवसेना पुरस्कृत म्हणून रिंगणात उतरलेल्या जनसेवक विकी सदाफुले यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला नवी रंगत आली आहे. त्यांचा प्रचार जोमात सुरु असून त्यांना मतदारांचे जनसमर्थन जोरात मिळत आहे. जनसेवक विकी सदाफुले हे वार्ड क्रं. 4 मधील मतदार आहेत.
      जनसेवक विकी सदाफुले यांच्या प्रती प्रभागातील त्यांच्याप्रती जनतेचा विश्वास वाढत आहे. त्यांच्या सहज, मनमोकळ्या स्वभावामुळे मतदारांमध्ये त्यांची ओळख 'आपल्यातली व्यक्ती' अशी तयार झाली आहे. प्रचारादरम्यान जनसेवक विकी सदाफुले दररोज अनेक घरांना भेटी देत, नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत आहेत. "प्रभागाचा सर्वांगीण विकास हा माझा मुख्य ध्यास आहे. स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, महिला सुरक्षा-या सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुमचा विश्वास हा माझीच ताकद आहे," असे त्या मतदारांना सांगत आहेत.
      त्यांच्या प्रचारात कार्यकर्ते सक्रिय योगदान असून, तरुणांपासून महिलांपर्यंत अनेक मंडळी स्वतःहून प्रचारात सहभागी होत आहेत. परिसरातील ज्येष्ठ नागरिक देखील त्यांच्या शांत, अभ्यासू व व्यवहार्य स्वभावाची प्रशंसा करताना दिसत आहेत.
     प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक प्रश्नांवर काम करण्याची तयारी विकी सदाफुले यांनी जाहीर केली आहे. त्यांचा भर पारदर्शक व उत्तरदायी स्थानिक प्रशासनावर असून, नागरिकांसोबत सतत संवाद ठेवण्याचे वचनही त्यांनी दिले आहे. 
    सध्या प्रभागात त्यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग क्रमांक 4 मधील निवडणूक चुरशीची होणार असून विकी सदाफुले यांचा विजय निश्चित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या