Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री ना विखे व सभापती प्रा रामशिंदे यांच्या माध्यमातुन लवकरच डोणगाव अंधार मुक्त करणार माजी पं स उपसभापती अंकुश ढवळे यांचे ग्रामस्थाना आश्वासन...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098/9615179615

जामखेड:- डोणगाव ता. जामखेड येथे आज सकाळी माजी उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक यांनी आज डोणगाव येथे भेट दिली.
        त्यावेळी त्यांनी डोणगाव ग्रामस्थासोबत संवाद साधून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी त्यांना ग्रामस्थांनी दररोज सिंगल फेज चा सारखाच डिव पडत असल्याने कधी कधी तर पूर्ण रात्र अंधारात काढत असल्याबद्दल ढवळे यांना सांगितले. त्यानंतर डोणगाव ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात अंकुश ढवळे यांना निवेदन देऊन विनंती अर्ज केला.
       त्यावेळी अंकुश ढवळे यांनी पारगाव रोड भैरोबावस्ती, पोठरे वस्ती, यादव वस्ती, मोरे गायरान वस्ती, खंडोबा वस्ती येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या व ढवळे यांनी सांगतले कि, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर डोणगाव गावाला अंधारापासून मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
   त्यावेळी भाजपा जेष्ठ नेते राम पवळ, तालुका सरचिटणीस पोपट जामदाडे, माजी सरपंच बाळासाहेब यादव मेजर, उपसरपंच अमोल यादव, माजी सरपंच सुभाष धनवे, रामेश्वर यादव मेजर,रामेश्वर यादव मेजर, परशु यादव, मनोज यादव, सुभाष वाघमारे, सुभाष वारे,बुवासाहेब पोठरे, दत्तात्रय तिखे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या