Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक स्वराज्य संथाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे


कम्युनिस्ट नेते कॉम्रेड राजू गैनवार 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : नुकतेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आढावा बैठक शाहिद हुतात्मा स्मारक भद्रावती येथे पार पडली सर्व प्रथम कॉम्रेड कॉर्ल मार्क्स - कॉम्रेड ऐन्गल्स - कॉम्रेड लेनिन - कॉम्रेड शाहिद भगत सिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व मंचावरील सर्व अतिथिंचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले 
या बैठकीचे अध्यक्ष कॉम्रेड राजू 
गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड राजू गैनवार भा क पा - कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन जिल्हा कार्यकारणी सदस्य भा क पा - कॉम्रेड शेख शकील तालुका अध्यक्ष किसान सभा - कॉम्रेड सुरेश कांबळे कामगार नेते भा क पा व इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते 
सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करतांना कॉम्रेड राजू गैनवार म्हणाले कि आम्ही नेहमीच सिद्धांतांच्या आधारे नीती घडविली भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केलाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम बरेच वर्षा पासून संघर्षाचा लढा सुरु आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम शेतमजूर - शेतकरी - कामगार - युवक -  वीद्यार्थी - महिला व जनतेमध्ये जोरात काम सुरु आहे भद्रावतीच्या विकासासाठी पक्ष अहोरात्र झटत आहे भारतीय 
कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहे. 
26 डिसेंबर 1925 साली कानपुर येथे पक्षाची स्थापना झाली शंभर वर्षाच्या कम्युनिस्ट चाळवळीचा आढावा घेऊन कष्टकरी समुदाय व पुरोगामी चळवळ कशी पुढे जाईल यांचा विचार कार्यकर्त्यांनी करावा केंद्रामध्ये जसे महागठाबंधन आहे तसे स्थानिक पातळीवर सुद्धा गट बंधन झाले पाहिजे भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे नगर परिषद निवडणुकीच्या पार्शभूमीवर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - शिव सेना उ बा ठा - आरपीआय सर्व गट - भीम आर्मी - बहुजन समाज पार्टी व इतर समविचारी पक्षाला घेऊन 
गठबंधन करण्याचा विचार सुरु आहे  गठबंधन न झाल्यास भारतीय 
कम्युनिस्ट पक्ष स्वतंत्र पणे नगर परिषद निवडणूक लढू अशी ठाम भूमिका घेतली आहे व संपूर्ण प्रभाग व नागराध्यक्ष निवडणूक लढवणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुकीत कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी व कामगारांनी असे लढावे कि विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे असे राजू गैनवार म्हणाले 
इच्छुक उमेदवारांनी निवडणूक अर्ज - फार्म भरायचा असल्यास कॉम्रेड राजू गैनवार - कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन - कॉम्रेड शेख शकील - कॉम्रेड दिलीप वनकर यांचेशी संपर्क साधावा 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड दिलीप वनकर यांनी केले व संचालन कॉम्रेड कृष्णा डोंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम्रेड रवींद्र तराळे यांनी मानले आणि कार्यक्रमांची सांगता झाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या