सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- आज नगर परिषद निवडणुकी संधर्भात तिसऱ्या आघाडीचे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
त्यावेळी ऍड. डॉ.अरुण जाधव म्हणाले कि, जामखेड येथे अनेक वर्षांपासून आम्ही राजकीय सामाजिक काम करत आहोत आमचा मतदारांवर विश्वास आहे. यूवा नेतृत्व वसीम भाई बिल्डर कुरैशी यांची आई जैनब वाहेद कूरैशी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून तिसरी आघाडी सत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे.
जामखेडच्या विकासाच्या लढाईत आम्हीच जिंकणार आहोत जनतेवर आमचा विश्वास आहे. दोन आमदारांच्या भांडणात जामखेडच्या विकासाचा श्वास गुदमरला आहे. अनेक कामे रखडली आहेत.
यामुळे जामखेड वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शेकाप यांनी तिसरी आघाडी स्थापन केली असल्याचे तिसऱ्या आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.


0 टिप्पण्या