सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- जामखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने दिनांक 26. 11.2025 रोजी नगरपरिषद जामखेड कार्यालययामध्ये उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले.
प्रभाग क्रमांक चार चे शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार विकी मुरलीधर सदाफुले यांना छताचा पंखा हे चिन्ह भेटले असल्याने सदाफुले यांच्या समर्थकांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यावेळी विकी सदाफुले बोलताना म्हणाले कि, प्रभाग 4 मध्ये अनुसूचित जाती पुरुष या जागेवर मी अपक्ष म्हणून फॉम भरला होता मला शिवसेना ( शिंदे गट ) यांनी पुरस्कृत म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे.
अनु. क्र. 2 चिन्ह छताचा पंखा हे चिन्ह मिळाले आहे. तरी मी मायबाप जनतेला हात जोडून नम्र विनंती करतो कि, आपले शिवसेना शिंदे गट पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पायलताई आकाश बाफना, शिवसेना पक्षाचे क्र. 4 (ब ) सर्वसाधारण महिला नगरसेवक पदाचे उमेदवार नम्शा फहिमुद्धीन शेख या उभे आहेत. ह्या दोन्ही व्यक्तीच्या नावा पुढे धनुष्यबाण चिन्ह आहे या चिन्हा समोर आपण बटण दाबावे. तसेच शिवसेना पुरस्कृत उमेदवार शिवसेना पक्षाचे प्रभात क्र 4 (अ )अनुसूचित जाती नगरसेवक पदाचे उमेदवार पुरुष मी स्वतः (विकी मुरलीधर सदाफुले ) उभा आहे.
आपल्या जामखेड च नाक असलेल्या माझ्या व्यापारी वर्गाला जो पर्यंत मी नगरसेवक असेल तो पर्यंत या व्यापार पेठेच मी एक लेक , एक लहान भाऊ , कुटुंबातला सदस्य म्हणून सदैव रक्षण करीन व माता बघीनींच्या पाठीशी सदैव खंभीर पणे हा भाऊ उभा राहील असे आश्वासन दिले. व आपण मला एक वेळेस संधी देतात अशी अपेक्षा व्यक्त केली. तरी आपण प्रभाग क्र. 4 मधील सर्व मतदारांनी धनुष्यबाण छताचा पंखा या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करावे असे मायबाप जनतेला विकी सदाफुले यांनी नम्र विनंती केली आहे.


0 टिप्पण्या