भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षा पदाकरीता उभे असलेले उमेदवार अनिलभाऊ धानोरकर यांचा महिला पुरुषांनी चांगला समाचार घेतला.
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नगर पालिकेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असतांना विविध राजकीय पक्षांचे उमेदवार प्रभागात जावून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करित आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाकरीता उभे असलेले उमेदवार माजी. नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांच्या मागील काळात केलेल्या विकास कामाचा पाढा वाचून गवराळा प्रभागातील महिला व तरुणांनी यांचा चांगलाच समाचार घेतल्याचा विडिओ सोशल मिडीयावर चांगलाच वॉयरल होत आहे.
यापुर्वी शिवसेना, कॉग्रेस, वंचित आघाडी व आता भाजप असा प्रवास करणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर येथील गवराळा प्रभागात मतदारांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळ प्रभागातील महिलांनी व तरुणांनी अनिल धनोरकर यांचा गेल्या १५ वर्षात भद्रावती नगरपालिकेचे राजकारण करणारे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना महिला तथा तरूणांनी शाब्दिक वार करुन धू… धू… धुतले… वार्डातील भौतिक समस्या, घरकुल योजना व दारू याविषयावर जनतेनी धानोरकर यांना जाब विचारला.
या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ न शकल्याने धानोरकर यांना अक्षरश: पळता पाय काढावा लागला. यावेळी महिलांनी धानोरकर यांना वार्डात येणार विकास निधी का थांबविला, घरकुलाची कामे का रखडलेली आहेत, मागील १५ वर्षात रस्ते नाही, गट्टू नाही, नाल्या नाही याला विकास म्हणतात काय...?असा उपरोधीक प्रश्न केला, नगराध्यक्ष विकास कामे होऊ देत नव्हते असा आरोप शिवसेना उठाबाच्या माजी नगरसेविका आणि आताच्या शिवसेना( शिंदे) गटाच्या मिनल आत्राम यांनी केला. यावेळी एकत्र आलेल्या प्रभागातील महिलांनी धानोरकर यांना दारू दुकानावरूनही खडे बोल सुनावले. दारूचे दुकान तुमचे आहे. दारू तुम्हीच विकता आणि त्यामुळे आमच्या मुलांचे आयुष्व उध्वस्त होत आहे. आता वर तुम्हीच आम्हाला तोंडाला दारूचा वास येत आहे म्हणून सांगता, हा काय प्रकार आहे.
निवडणूक आली की सर्वच आश्वासन देतात. मग पाच वर्षे कुणी ढुंकून बघत नाही, नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून प्रभागातील काम करुन घ्यायचा दम नाही तर कशाला उभे राहते असा थेट प्रश्नही महिलांनी यावेळी केला. जसे मालेगावला विषारी दारु पिल्याने घडले तशी घटना भद्रावतीत घडायला वेळ लागणार नाही असेही महिला म्हणाल्या. महिलांकडून होणारी प्रश्नांची सरबती बघता अनिल धानोरकर यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.


0 टिप्पण्या