Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा नेत्या सौ लक्ष्मी ताई पवार आपल्या सामाजिक कामाच्या बळावर वार्ड क्र ५ मधुन नगरसेवक पदासाठी प्रबळ दावेदार...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार वळणावर आली असून भाजपाने सर्वच पातळ्यावर आघाडी घेतली आहे.सभापती प्रा राम शिंदेसाहेबांच्या विश्वासु,जामखेड शहरातील धडाडीच्या भाजपा नेत्या सौ लक्ष्मी ताई पवार आपल्या सामाजिक कामाच्या बळावर वार्ड क्र ५ मधुन नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहेत.
राजकारणात काम करत असताना महिलाही अत्यंत सक्षमपणे समाजकारण करत असताना वारंवार आपल कर्तत्व सिध्द करत आहेत,
           जामखेड नगरपरीषद वार्ड क्र ५मधुन निवडणुक लढविण्याच्या तयारीत असलेल्या सौ लक्ष्मी ताई पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जनविकास सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता आणि महिल सक्षमीकरणावर अत्यंत चांगल काम केल आहे.
वार्ड क्र ५ मधील नागरीकांच्या अडचणी समजुन घेऊन त्या सोडविण्यासाठी सौ लक्ष्मी ताई पवार या नेहमीच अग्रेसर असतात,महिला सक्षमीकरणासाठी काम करत असताना विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे,सामान्य नागरीकांना  राशन कार्ड,आधार कार्ड, बनविण्यासाठी मदत करणे, गोरगरीब वंचित,उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे,असे अनेक काम लक्ष्मी ताई पवार आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नेहमीच करत असतात,याच सामाजिक कामाच्या बळावर आणि कामाच्या माध्यमातून मिळवलेल्या लोकप्रियतेच्या माध्यमातुन,येणाऱ्या काळात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत वार्ड क्र ५मधुन निवडणुक लढविण्यासाठी लक्ष्मी ताई पवार सज्ज आहेत,
*पक्षनिष्ठा आणि नेतृत्वाचा विश्वास यातुन जर संधी मिळाली तर नक्कीच एक सक्षम महिला म्हणुन लक्ष्मी ताई पवार या नक्कीच एक आदर्श नगरसेवक म्हणुन स्व:ताला सिध्द करतील यात शंका नाही!*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या