चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-नुकतेच काव्यप्रेमी शिक्षक मंच शाखा भंडाराच्या वतीने ए.के. सेलीब्रेशन सभागृहात काव्यप्रेमी शिक्षक मंच राज्यस्तरीय १६ वे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मा. प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संमेलनात मार्गदर्शन करताना ते म्हणाले , "एका अशा संमेलनात येण्याचा योग आला की, ज्या संमेलनात येणारे सर्व कवी व साहित्यिक आपल्या स्वखर्चाने व कोणतीही अपेक्षा न ठेवता येतात. आणि नियोजक पदरमोड करून संमेलन यशस्वी करतात. अशा काव्यप्रेमींबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे." पुढील काव्य संमेलन वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे घेण्यात यावे. ते दोन दिवसांचे घ्यावे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो असेही ते म्हणालेत.
झी मराठी फेम अभिनेते तथा प्रकल्प अधिकारी मा. राजाभाऊ धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. नवोदित कवींना वाव देणारे हे व्यासपीठ असून उत्तरोत्तर साहित्य संमेलनाची संख्या वाढावी अशा शुभेच्छा त्यांनी आपला उद्घाटकीय मार्गदर्शनातून दिल्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगरचे प्रसिद्ध लेखक तथा ग्रामसेवा दिवाळी अंकाचे उपसंपादक राजेंद्र फंड, स्वागताध्यक्ष दीपक सपकाळ, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्य समितीचे अध्यक्ष आनंद घोडके, सचिव कालिदास चवडेकर, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, उपाध्यक्ष प्रमोद बाविस्कर, सहसचिव सौ. जया नेरे, सदस्य भाऊसाहेब सोनवणे, सौ.वर्षा भांदर्गे, रामदास देशमुख , सुप्रसिद्ध साहित्यिक प्रमोद अणेराव, मनोज केवट, संयोजक सौ.कविता कठाणे , भंडारा जिल्हाध्यक्ष मंगलाताई डहाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ८:३० वाजता उद्घाटन पूर्व दोन कवी संमेलनाचे सत्र झाले. त्यानंतर ११ वाजता उद्घाटन सत्रात पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. त्यानंतर काव्य ओंजळ, काव्य तराणे, गझल तरंग (मुशायरा), हास्य तुषार, काव्य मैफिल, , बोली भाषेतील कवी संमेलन अशी काव्य सत्रे संपन्न झाली. दुपारच्या सत्रात 'समाजमाध्यमांचा साहित्यावर होणारा परिणाम' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षा हिंदी साहित्यिक सौ. वैशाली गोमकाळे होत्या. वक्ता म्हणून प्रा. अर्पणा कल्लावार, डॉ. निशा काळे, सौ. अर्चना कोहळे यांनी समाजमाध्यमाचा साहित्यावर होणारा सकारात्मक व नकारात्मक परिणाम आपल्या वक्तव्यातून सांगितले. संमेलनाचा समारोप पसायदानाने झाला.
सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. विणा डोंगरवार, डॉ. अस्मिता नानोटी, टी. डी. तनुश्री, डॉ.जयश्री सातोकर, सौ. प्रगती सोनटक्के, सौ. कविता दाते , सौ. विजयाताई कोरे , डाॅ. मुक्ता आगाशे , डॉ. गिता वाळके, प्रा. भाग्यश्री शिवणकर, , सोनाली कोरे, सारिकाताई दोनोडे, मेघा भांडारकर, मेघा चेटूले, निलिमा लांबकाने, विद्याताई सार्वे, टिकाराम कठाणे, झाशीराम पटोले , देवेंद्र मेढे, रोशनी मेंढे, डॉ. माधवी राखडे, उषा घोडेस्वार, सुषमा पडोळे , इत्यादी सावित्रीच्या लेकींनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे सदर संमेलनात २५० हून अधिक रसिक साहित्यिकांनी संमेलनात सहभाग नोंदविला.


0 टिप्पण्या