चित्रा न्युज प्रतिनिधी 
 पुणे :-राज्यात आचारसंहिता लागु होताच, पुणे पोलिसांकडून 22 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू होताच पुण्यात मोठी रोकड जप्त केली आहे. पुण्यातील नगरसेवक आंदेकरच्या घरावर पोलिसानी अचानक धाड टाकून 22 लाख रुपये रोकड जप्त केले.
   नगरसेवक बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी करून 22 लाख रुपये जप्त केली आहे. बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य पुणे महानगरपालिकेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असतानाच, पुणे पोलिसांनी आंदेकर यांच्यावर कारवाई केल्याने, राज्यभर खळबळ उडाली आहे.
   राज्य निवडणूक आयोगाने काल 15 डिसेंबर 2025 रोजी बृहन्मुंबई आणि पुण्यासहसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. ज्यात 15 जानेवारी 2026ला मतदान पार पडेल, 16 जानेवारी 2026ला मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच निवडणूकीची घोषणा होताच, राज्यात आचारसंहिता लागू झालीआहे. राज्यात आचारसंहिता काळात बंडू आंदेकरच्या घरात रोकड असल्याचा माहिती मिळाल्यावर पोलिसांनी काल सायंकाळी छापेमारी केली असता, 22 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
   पुण्याच्या राजकीय पटलावर आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व राहिलले आहे. आंदेकर कुटुंबातील सदस्य तुरूंगात असतानाही बंडू आंदेकर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत होता. त्यासाठी रोकड आणि इतर स्त्रोतांची जमवा जमव सुरू होती. याची माहिती पुणे पोलिसांना लागल्यावर त्यांनी धाड टाकली आहे.
  नगरसेवक आंदेकर कुटंबाचे राजकीय वर्चस्व आजही पुण्यात आहे. आंदेकर कुटुंबातील सदस्य वत्सला आंदेकर या काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. 1998-99 मध्ये त्यांनी पुणे शहराचे महापौरपद भूषवले आहे.  पुण्याचे नेते सुरेश कलमाडी यांच्या संपर्कात असल्याने त्यांनी महापौरपद मिळाले होते. वत्सला आंदेकर यांचे पुतणे वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर, आणि इतर सदस्यही नगरसेवक राहिले आहेत.