चित्रा न्युज प्रतिनिधी
मारेगाव : तालुक्यातील वनोजा ( देवी) येथील एशियन डेव्हलपमेंट बँक प्रतिनिधी शाहु साहेब यांनी प्रस्तावित 33 के व्ही उपक्रमावर चर्चा व स्थळपाहणीसाठी दि.10 डिसेंबर 2025 ला भेट दिली असून या भेटिचे आयोजन महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपणीचे उपकार्यकारी अभियंता शामसुंदर कुर्रा यांच्या द्वारे करण्यात आले होते. सदर चर्चेच्या अध्यक्षस्थानी वनोजा (देवी) येथील उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी उपस्थित होते.
यावेळी आयोजकानी ग्रामपंचायत कार्यालयाच्या व्हरांड्यात एशियन डेव्हलपमेंट बँक प्रतिनिधी व परिसरातील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत एशियन डेव्हलोपमेंट बँकचे प्रतिनिधी शाहु यांनी उपस्थितांना 20 ते 25 पर्यावरणा विषयावर प्रश्न विचारले होते. त्या विचारलेल्या प्रश्नांना उपस्थितानी छान प्रतिसाद दिला असून पर्यावरणा वरील चर्चा सकारात्मक घडुन आली. या चर्चेमध्ये सहभागी होण्याकरीता आपटि ग्रा.पं. येथील सरपंच विना सातपुते, विलास ठाकरे,मधुकर आसेकर लाखापुर, फिरोज शेख, सुरज लेनगुरे, मंगेश लेनगुरे, विकास मांदाडे,डोल डोंगरगाव , नरेश चिंचोलकर, प्रदिप चिंचोलकर दांडगाव, तर कानडा येथील रुपेश ढोके या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली असून वनोजा ग्रामपंचायत सदस्य सुधाकर धांडे,रमेश भोपरे, माजी सरपंच बंडू पुनवटकर, गंगाधर कडुकर, विजय टोंगे, राजेंद्र मिलमीले, बाळा बरडे, बालाजी टोंगे, गोवर्धन टोंगे, हणुमान डाखरे, नाशिर शेख, विकास वैद्य, चेतन दारुणकर, दविदास पाटील, रोजगार सेवक सिध्दार्थ खैरे, व इतर गावकरी उपस्थित होते.


0 टिप्पण्या