Ticker

6/recent/ticker-posts

तरुण बेपत्ता; माहिती देण्याचे आवाहन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
परभणी:- : परभणी शहरातील आनंदनगर, धार रोड परिसरातून एक तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार नानलपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

बेपत्ता तरुण कुणाला आढळून आल्यास तपासीक पोलीस निरीक्षक श्री. कदम (मो. ९४२३९१०९०२) किंवा नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आनंदनगर, धार रोड, परभणी येथील संगीता दत्तात्रय पोटे यांच्या बहीणीचा मुलगा दिपक सुधाकर सुरवसे  (वय 26 वर्ष, रा. एकसर डोंगरी बोरीवली  मुबई) हा दि. 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता परभणी शहरातील  आनंदनगर धार रोड येथून  अपना कॉर्नर येथे मोबाईल विकणार आहे व मी माझ्या घरी जाणार नाही असे कारण  सांगून निघून गेला आहे. त्याचा मोबाईल बंद आहे व तो घरी परत आला नाही आहे. 

याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तरुणाचा रंग गोरा, चेहरा गोल, केस काळे, उंची 5 फुट 5 इंच, बांधा मजबुत, अंगात शर्ट, पॅन्ट असून मराठी, हिंदी भाषा त्याला येते.  

कोणाला सदर वर्णनाचा तरुण  आढळुन आल्यास त्यांनी तपासीक पोलीस निरीक्षक श्री. कदम (मो. 9423910902) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक, नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या