Ticker

6/recent/ticker-posts

गडचिरोली जिल्ह्यात सर्वेक्षणात आढळल्या २५७३२ एकल महिला...

चित्रा न्युज प्रतिनिधी 
गडचिरोली :-महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्याने ही आता एकल महिलांचे सर्वेक्षण केले आहे पुणे नगर नाशिक परभणी या पाठोपाठ सर्वेक्षण करणारा गडचिरोली हा पाचवा जिल्हा ठरला आहे
गडचिरोली जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व एकल महिलांचे सर्वेक्षण केले असून त्यात २५ हजार ७३२ एकल महिला आढळून आल्या आहेत.. 

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे यांच्या  पुढाकारातून हे सविस्तर सर्वेक्षण या महिलांसाठी पुनर्वसन कार्यक्रम राबवण्यासाठी करण्यात आले आहे...

या महिलांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी या महिलांचे अधिक सूक्ष्म सर्वेक्षण उमेद अभियानाच्या वतीने ही मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. गाडे यांनी करून घेतले. त्यामध्ये विविध प्रकारची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली आहे. 

या सर्वेक्षणात आढळलेल्या २५७३२ 
एकूण एकल महिलामध्ये  माहिती दिलेल्यांपैकी २२६४६ विधवा महिला असून 
११४९ घटस्फोटीत महिला, ४०७ परित्यक्ता महिला व १०७४ महिला या प्रौढ अविवाहित महिला आहेत.

या एकल महिलांमध्ये  अनुसूचित जमातीच्या  
 ७७१६ अनुसूचित जातीच्या २८६३ महिला असून उर्वरित इतर संवर्गातील महिला आहेत .

उमेदने व्यवसाय करू शकणाऱ्या बचत गटातील एकल महिलांचाही अभ्यास केला. त्यात २० ते ४० वयोगटातील ३७७१ महिला ४१ ते ५० वयोगटातील ४९११महिला आहेत तर ५१ ते ६० वयोगटाच्या ५६२९ महिला आहे व उर्वरित महिला या ६० पेक्षा जास्त वयोगटाच्या आहेत.६०वर्षाच्या आतील वयोगटाच्या १४३११ महिलांच्या रोजगारासाठी बचत गटाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत...

आत्तापर्यंत खेळत्या  भांडवलामधून ११५८४ एकल महिलांना कर्ज देण्यात आले तर समुदाय गुंतवणूक निधीतून ६३१८  महिलांना कर्ज देण्यात आले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या