Ticker

6/recent/ticker-posts

आ.जयंत पाटील यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल नाभिक समाजाचा निषेध


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती/ चंद्रपूर : आ.जयंत पाटील यांनी पोलीस काय हजामत करत होते काय? अशा बेताल वक्तव्यामुळे नाभिक  समाजाला अपमानीत केल्याबद्दल आ.जयंत पाटील यांचा सर्वत्र निषेध होत आहे.

हिवाळी अधिवेशना दरम्यान माजी मंत्री जयंत पाटील यांनी बेताल विधान करुन समस्त नाभिक समाजाचा अपमान केल्याचा आरोप नाभिक समाजातील अनेक संघटनांनी केला आहे. 
    नाभिक समाजाबद्दल असे बेताल विधान करणे अत्यंत निंदनीय असुन हे एका जबाबदार लोकप्रतिनिधी यांना शोभणारे नसून या वक्तव्याचे महाराष्ट्रात सर्वत्र पडसाद उमटत असून नाभिक समाजाने जयंत पाटील यांचा धिक्कार केला आहे. नाभिक समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन या विधानाचा तिव्र निषेध करत आहे. तसेच  सोशल मिडियावर व्हाट्सअप फेसबुक द्वारे नोंदवला आहे.
यावेळी नाभिक समाजाच्या भावनांचा विचार करुन राज्य सरकारने महत्वाचे पावले उचलावे अशी मागणी करण्यात आली आहे. नाभिक समाजाला कायद्याचे सुरक्षा कवच मिळावे याकरिता ॲट्रॉसिटी सारखा कायदा करुन समाजाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी नाभिक समाज करीत आहे.
       यापुर्विही असे विधाने बऱ्याच नेत्यांनी वापरली आहेत त्यानंतर नाभिक समाज सघटना जाहीर निषेध नोदवतात मग समोरची व्यक्ती माफी किंवा दिलगिरी मागतो याच प्रमाणे आमदार जयंत पाटील यांनी सुद्धा माफी मागीतली आहे. यासाठी ठोस अशा उपाय योजना करीता तिव्र आंदोलने करणे गरजेचे आहे. 

आमदार जयंत पाटील यांची दिलगिरी व्यक्त

मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. मी संपूर्ण नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त करतो अशी चूक व्हायला नको होती. ती झाली. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक व्हायला नको होती असं मला वाटतं....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या