चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर :-अधिवेशन स्थळी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस श्री डी. एस. पवार यांचे नेतृत्वात संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मा.ना.श्री प्रकाशजी आंबिटकर साहेब मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्याचे निवेदन दिले. निवेदनामधिल मागण्यावर सकारात्मक चर्चा झाली. .
त्यानंतर मा.डाॅ. संदीप सांगळे सर सहसंचालक आरोग्य सेवा (हि. ह. व जरो ) पुणे प्रदेश सरचिटणीस श्री डी. एस. पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकार्यांनी भेट घेतली. प्रस्तावित मागण्याचे निवेदन देऊन चर्चा केली.
यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीबाबत या संघटने कडून सतत पाठपुरावा करण्यात येत असूनही अद्यापही पदोन्नती प्रकरण निकाली निघालेले नाही. याबाबत माननीय सहसंचालक महोदयांनी
दि.१६ फेब्रुवारी २०२४ चे शासन परिपत्रकानुसार गट क व ड संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी विभागीय उपसंचालक यांना घोषित केले असल्याने पदोन्नतीची प्रक्रिया त्यांचे स्तरावरून राबविण्याल्या जाणार आहे. यावर आरोग्य निरिक्षकाचे राज्य स्तरावरील सेवा ज्येष्ठतेबाबत प्रश्न उपस्थित केला असता यानंतर विभागीय स्तरावर गट क व ड सर्व संवर्गाच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार करून रिक्त पदाचे संख्येनुसार पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याल्या जाणार आहे.
हिवताप विभागाचा सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात मंजूर पदसंख्येत वाढ सुचविण्यात आली आहे. राज्यस्तर व स्थानिक स्तरांमधील समकक्ष संवर्गातील पदाची सुधारित सेवा प्रवेश समान करण्यात संदर्भात योग्य तो विचार करण्यात येईल . आरोग्य विभागातील फिरती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि. ३ मार्च २०१० चे शासन निर्णयानुसार कायम प्रवास भत्ता लागु करण्यात आला तथापि गेल्या १५ वर्षामध्ये त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. प्रवासाचे दर, इंधनाचे दर, महागाई मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे त्या प्रमाणात कायम प्रवास भत्यामधे किमान तिप्पट वाढ करावी. याबाबत सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला असल्याने लवकरच यावर निर्णय होईल
जिल्हा हिवताप अधिकारी गट ब ची ९० पदे मंजूर आहेत यामधील ८०% पदे रिक्त असुन सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय अधिकारी यांचे कडे सोपविलेला आहेआहे. जिल्हा हिवताप अधिकारी या संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडून एम पी एस सी कडे पाठविलेला आहे. लवकरच सदर पदाची जाहिरात निघणार आहे. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी व अवैद्यकिय आरोग्य अधिकारी या संवर्गाचे रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार पदोन्नती साखळीचे संवर्गातील शैक्षणिक पात्रता व विहित अहर्ताधारकांकडे देण्यात यावा अशी मागणी संघटने कडून करण्यात आली.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदनाम ग्राम आरोग्य अधिकारी, उपनिरीक्षक याप्रमाणे करण्यात यावे याबाबत जिल्हा परिषद व राज्य स्तरीय समकक्ष पदाचा समन्वय साधून संबंधित विभागाकडून सविस्तर माहिती घेऊन त्यावर सकारात्मक भूमिका दर्शविली.
७ व्या वेतन आयोगामधे ३० वर्षाचे सेवेनंतर सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे. हिवताप विभागातील पात्र कर्मचार्यांना तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा यासाठी संघटनेने शासन व प्रशासनाकडे सतत निवेदन देऊन पाठपुरावा केलेला आहे. या संघटनेचे दि.६/०१/२५ व १७/०२/२५ चे निवेदनावर मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे या संघटनेस अग्रेषित असलेल्या दि. २७/१०/२०२५ चे पत्रकानुसार नागपूर, नासिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद व लातूर या विभागीय उपसंचालक यांनी कार्यवाही केलेली आहे व तसे आदेशही निर्गमित केलेले आहे. तथापि अकोला विभागामध्ये सदरचे प्रकरण अद्यापही प्रलंबित असल्याचे माननीय सहसंचालक महोदयांचे निदर्शनास आणून देण्यात आले त्यावर त्यांनी गट क व ड चे नियुक्ती प्राधिकार शासनाने नुकतेच विभागीय उपसंचालक यांचेकडे दिले असल्यामुळे त्यांचे स्तरावर पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात येतील. तसेच खुल्लर समितीचे शिफारसीनुसार दिनांक 2 जून 2025 चे शासन निर्णयाप्रमाणे वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली तथापि काही कर्मचार्याचे जुन्या वेतनश्रेणीत केलेली वेतन निश्चिती सुधारित मध्ये वेतन कमी होत आहे या बाबतीत योग्य ती कार्यवाही करण्याचे मान्य केले.
मा. सहसंचालक आरोग्य सेवा (हि.ह व जरो) पुणे यांनी या संघटनेचे शिष्टमंडळाला चर्चेस वेळ देऊन प्रस्तावित मागण्यावर विस्तृत चर्चा करून सकारात्मकता दर्शविली. संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच संघटनेची शिष्टमंडळाची लवकरच बैठक घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. संघटनेचे शिष्टमंडळामधे नागपूर जिल्ह्याचे सरचिटणीस श्री दीपक गोतमारे, कृष्णा अवधूत, बाहतकर, सुशील वाणी, देवानंद वर्धेने, संजय तांदुळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---


0 टिप्पण्या