चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:—नांदेड-बिदर जाणा-या राज्यमार्गावर असलेल्या हाळी,हंडरगुळी व सुकनी या गावातील शालेय मुले,वयस्कर व अपंग मंडळी यांना राज्यमार्ग क्राॅस करतेवेळी काळजात धकधक होत आहे.
कारण,या राज्यमार्गावर धावणा-या वाहनांच्या स्पीडला ब्रेक लावणारे एकही ब्रेकर नसल्याने लहान-मोठी वाहने वायुवेगाने धावताना बघून या ठिकाणच्या जनतेच्या काळजाचा ठोका चुकतो.तेंव्हा या ठिकाणी ३ ते ४ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी हाळी,हंडरगुळी व सुकनी येथील विद्यार्थी,वयस्कर,अपंग नागरीकातून होत आहे.तर या बाबत विचारणा केलो असता कुणीही लेखी मागणी केली की मगच या ठिकाणी ब्रेकर बसविण्यात येतील.अशी माहिती सा.बां.खाते उदगीर येथील जे.ई.नी फोनवरुन दिली आहे.
सुकणी या गावातील जि.प.शाळा, ग्रा.पं.पोस्ट आॅफीस,३ मंदीर आणि अनेकांची वस्ती व बसथांबा,किराणा दुकाणे नांदेड- बिदर रोडलगतच असल्यामुळे हा रोड सतत गर्दीने भरलेला दिसतो.पण एकही स्पीड ब्रेकर नसल्याने दोन्ही बाजुंनी येणा-या गाड्या अतिवेगाने धावत असल्याने शाळकरी विद्यार्थी,जेष्ठ व अपंग मंडळींना जीव धोक्यात घालुनच हा रोड ओलांडावा लागत आहे.म्हणुन सुकनीत किमान तीन गतिरोधक बसवावेत.अशी मागणी सुकनीकरांतुन होत आहे.
हाळीहंडरगुळी येथील २ बाजारपेठा, २ ग्रा.पं.२ पोस्ट आॅफीस,२ बॅंका व शाळा,काॅलेज,२बसथांबे या रोडवर आहेत.तसेच देशाच्या अनेक राज्यां मध्ये प्रसिध्द असलेला गुरांचा बाजार हा पण हंडरगुळीत असल्याने नांदेड- बिदर या रोडवर रोज हजारो प्रवाशी ये-जा करतात.पण या रोडवर पाच ठिकाणी गरज असूनही एक पण गतिरोधक बसवले नसल्याने अपंग, वयस्कर मंडळी व शालेय मुल-मुली यांना हा रोड ओलांडताना काळजात धकधक होत असल्याची चर्चा आहे. तेंव्हा हाळी-हंडरगुळीत बसस्थानक ते शिवाजी ज्यु.काॅलेज दरम्यान चार ते पाच ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी हाळी-हंडरगुळीकरांची आहे.
स्पीड ब्रेकरची गरज असूनही सुकनी येथे ते बसविले नसल्याने अनेकांना विशेष करुन अपंग,जेष्ठ व शालेय मुलांना हा रोड जीव धोक्यात घालुन ओलांडावा लागतोय.
चांदोबा सुकणे,सुकनी.
बसथांबा,पोस्ट आॅफीस,ग्रा.पं.सह जि.प.शाळा व कांही घरे राज्यमार्गा लगतच असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ असते.माञ येथे गतिरोधक नसल्याने सगळीच वाहने सुसाटपणे धावत असतात.तरीही येथे स्पीड ब्रेकर बसवले नाहीत.येथे एखादा अपघात झाल्यावरच प्रशासन स्पीड ब्रेकर बसविणार आहे का?
उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे व राज्यमार्गावरचे गाव असूनही अद्याप गतिरोधक का बसविले नाही. एखादी दुर्देवी घटना घडण्याची वाट प्रशासन बघत आहे का?
फारुख शेख,नागरीकहाळीहंडरगुळी
स्पीड ब्रेकर बसवायचे असेलतर सा.बां.विभाग किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर लेखी मागणी करावी लागेल.मग पोलिस प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्याकडून स्थळ पाहणी होते.आणि मग किती स्पीड ब्रेकर लागतील ठरते.नंतरच स्पीड ब्रेकर बसवले जातात.
सुनील नरहरे,जे.ई.सा.बां.विभाग
उदगीर


0 टिप्पण्या