चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई,: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई यांच्या महिला विकास विभागातर्फे वधू-वर व घटस्फोटितांचा मेळावा रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सिद्धार्थ सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, लोखंडवाला रोड, चार बंगला, अंधेरी (प.), मुंबई – ४०० ०५३ येथे संपन्न होणार आहे.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान केंद्राचे अध्यक्ष आयु. विजय जाधव भूषविणार आहेत. समाजात विवाहविषयक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे, योग्य जुळवणीसाठी प्रयत्न करणे, वधू-वरांची माहिती उपलब्ध करून देणे, घटस्फोटितांना नव्या आयुष्याची सन्मानपूर्वक संधी देणे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवमूल्यांवर आधारित विचारांच्या अनुषंगाने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जात, धर्म व आर्थिक स्तर या पारंपरिक भिंती ओलांडून माणूस म्हणून माणसाशी नाते जोडण्याची बाबासाहेबांची शिकवण या मेळाव्याच्या माध्यमातून समाजात रुजवण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.
याशिवाय, विवाहोत्सुक उमेदवारांसाठी दर शनिवार व रविवार सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत केंद्रात नवीन नोंदणीची सुविधा नियमितपणे उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मेळाव्यासाठी इच्छुक वधू-वर व घटस्फोटितांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक असून, पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे बंधनकारक आहे.
या उपक्रमाचे आयोजन महिला विकास विभागातर्फे करण्यात येत असून, सरचिटणीस आयु. चंद्रकांत बच्छाव, विश्वस्त आयु. नीना हरिनामे, तसेच सर्व विश्वस्त व आयु. ज्ञानेश्वर ठोकळे यांचा सहभाग आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३७९६५२१८


0 टिप्पण्या