Ticker

6/recent/ticker-posts

ओकीनावा मार्शल आर्ट कराटे डो सेंटर भद्रावती व श्री हनुमान जन्मोस्तव समिती भद्रावती तर्फे भव्य रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रम संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती  :-दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शहरातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कराटे पटू सेंसाई मास्टर स्वर्गीय प्रकाश कोवे तथा सेमफाई मास्टर मुन्ना शर्मा यांच्या स्मुर्ती पित्यर्थ ओकीनावा मार्शल आर्ट कराटे डो सेंटर भद्रावती व श्री हनुमान जन्मोस्तव समिती भद्रावती तर्फे   शिंदे हॉस्पिटल समोर हनुमान मंदिर परिसर मेन रोड भद्रावती  एक दिवसीय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या विविध कार्यक्रमाला पंधरा ते सोळा वर्ष होत आहे 
सर्व प्रथम स्वर्गीय सेंसाई मास्टर प्रकाश कोवे व स्वर्गीय सेमफाई मास्टर मुन्ना शर्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पुज्याअर्च्या करण्यात आले परंपरेनुसार बो करून प्राथर्ना करण्यात आले 
कार्यक्रमाचे उदघाटन सेमफाई मास्टर पवन हूरकट  सामाजिक कार्यकर्ते यांनी केले 
कार्यक्रमाचे अध्यक्ष सेंसाई मास्टर विजय ठेंगे हे होते 
तर प्रमुख पाहुणे म्हणून सेंसाई मास्टर मनीष सारडा  माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती - सेमफाई मास्टर  अनिल मोडक सामाजिक कार्यकर्ता - सेमफाई मास्टर रत्नाकर साठे सामाजिक कार्यकर्ता - सेमफाई मास्टर प्रा डॉ कार्तिक शिंदे - सेमफाई मास्टर राजू गैनवार माजी नगरसेवक - सेमफाई मास्टर विनोद वानखेडे माजी नगरसेवक इत्यादी मान्यवर मंच्यावर उपस्थित होते 
सामान्य जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांचे डॉ व अधिकारी - कर्मचारी यांची चमू यांनी सेवा देऊन सहकार्य केले 
आपल्या जीवनाच्या अल्पकाळात भद्रावतीत आत्मसरंक्षण करण्याचे दृष्टीने प्रेरणा त्यांनी दिली भद्रावती शहरात व तालुक्यात ते प्रख्यात होते व सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते लोकांसमोर आले होते त्यानीं बरेचदा लोकांच्या समस्याचें निवारण केले तालुक्यातील युवापिढीला आठवण राहावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे सगळयात श्रेष्ठदान असून एक महत्वाचे राष्ट्रीय सामाजिक कार्य आहे या रक्तदानामुळे अनेक गरजूनां जीवनदान मिळत असते रक्तदान केल्याने दुष्परीनाम होत नाही यामुळे या रक्तदान शिबिरात सामाजिक संघटना - शैक्षणिक संघटना- क्रीडा संघटना - व्यापारी संघटना- ऍटो संघटना व इतर  सामाजिक संघटनानी तथा शेकडो युवक - युवती  सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता सतीश वनकर -  अनिल डोये - विलास दाते - प्रशांत बरडे - राजू डाखरे - प्रशांत इंगळे - मोहन कोवे - डॉ नितीन सातभाई - सुभाष पिदूरकर - ललित कोलते - श्रीराम रुयारकर - संतोष लामकासे- विनोद रुयारकर - शैलेश बंडावार - शीतल बहादे - मनोज पाझारे - चंद्रकांत खाडे - रवींद्र राव - अशपाक अली - अमित शर्मा - जय पचारे - निलेश जैन - रितेश वनकर - अमोल भडगरे  - निलेश नवराते इत्यादी समितीच्या पदाधिकारी व सदस्यानी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या