Ticker

6/recent/ticker-posts

वानखेडे स्टेडियम येथे सचिन-मेस्सीची ऐतिहासिक भेट; चाहत्यांचा जल्लोष!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनले, जेव्हा क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी यांची भेट झाली. दोन वेगवेगळ्या खेळांमधील हे जागतिक दिग्गज एकत्र आल्याने स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

मेस्सीचे वानखेडे स्टेडियम येथे जोरदार स्वागत करण्यात आले आणि या संपूर्ण भेटीदरम्यान मैदान 'सचिन-मेस्सी'च्या नावाच्या घोषणांनी दुमदुमले होते.

या भेटीदरम्यान या दोन्ही आयकॉन्सने एकमेकांना भेटवस्तू देऊन प्रत्येकाचे हृदय जिंकले. सचिन तेंडुलकरने आपल्या टीम इंडियाच्या जर्सीवर स्वाक्षरी करून ती मेस्सीला भेट दिली. तर, लिओनेल मेस्सी यानेही तेंडुलकरला भेट म्हणून स्वाक्षरी केलेला फुटबॉल दिला. या ऐतिहासिक क्षणी सचिन आणि मेस्सी यांनी एकत्र फोटो काढले, जो क्षण जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या