Ticker

6/recent/ticker-posts

सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती.महाराष्र्ट


सुधारित पेन्शनचे आंदोलन यशस्वी
बेमुदत साखळी उपोषण संस्थगित


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-सरकारी - निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितच्या माध्यमातून राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यशवंत स्टेडियम,धंतोली येथे दि.०९ डिसेंबर पासून "बेमुदत" साखळी उपोवण आंदोलन सुरु केले होते.राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन राज्याच्या मा.मुख्यत्र्यांनी मा.मुख्यसचिवांना संघटनेसह सकारात्मक चर्चा करण्याचे आदेश दिले.
     आज दि.११ डिसेंबर रोजी उपोषणाच्या तिस-या दिवशी राज्याचे मुख्य सचिव मा.राजेश अग्रवाल यांनी समन्वय समितीच्या सुकाणू समितीसह चर्चा केली. या चर्चेत कर्मचारी शिक्षकाच्या राष्र्टीय सुधारित पेन्शन संदर्भात कार्यपध्दती व नियम अधिसूचना सत्वर पारीत केली जाईल तद्वतच कर्मचारी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सेवांतर्गत प्रश्न  मांडून ठोस निर्णय घेण्यासाठी चर्चासत्राचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल असे स्पष्ट केले.उर्वरित १६ मागण्यांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी संघटनेस येत्या १५ दिवसांत चर्चेसाठी पाचारण केले जाईल असेही स्पष्ट केले.संघटनेने पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती मा.मुख्य सचिवांनी केली.
     सुकाणू समितीने शासनाने मागण्या सोडविण्या संदर्भात घेतलेला पुढाकार कर्मचारी-शिक्षकाभिमूख असल्यामुळे मा.मुख्य सचिवांनी मा.मुख्यमंत्र्याच्या वतीने केलेल्या आंदोलन संस्थगितीच्या विनंतीला प्रतिसाद देण्याचा एकमुखी ठराव सर्व उपस्थितांनी केला.
     आजच्या चर्चेसाठी गेलेल्या शिष्टमंडळात सर्वश्री विश्वास काटकर,अशोक दगडे, उमेशचंद्र चिलबुले,शिवाजी खांडेकर,भाऊसाहेब पठाण,संतोष पवार,सलीम पटेल,सुरेंद्र सरतापे,सुबोध किर्लोस्कर,गौतम कांबळे आणि गणेश देशमुख यांनी सहभाग घेतला असल्याचे   सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती अमरावती जिल्ह्याचे  निमंत्रक श्री डी. एस. पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये   कळविले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या