Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी साहेब सोबत बैठकीत भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा संघाची सविस्तर चर्चा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा संघाच्या वतीने आज मा जिल्हाधिकारी साहेब सावन कुमार भंडारा यांच्याशी सविस्तर चर्चा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीदरम्यान संघाचे अध्यक्ष संजय मते तसेच  संचालक मंडळ बेरोजगार संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी, रोजगाराच्या संधी व कामे देण्याबाबत सविस्तर मांडणी केली. यावेळी मा. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपस्थितांचे म्हणणे व्यक्तिशः शांतपणे ऐकून घेतले तसेच संबंधित विषयांवर सकारात्मक भूमिका घेत पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे संचालक यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानाबद्दल भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार संघाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
प्रतिक्रिया
या बैठकीमुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा मिळेल, तसेच रोजगारनिर्मितीच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जातील, अशी आशा संघाचे अध्यक्ष् संजय मते यांनी केली व कमी वेळा मध्ये जिल्हाधिकारी साहेब यांनी चर्चा घडवून आणले त्यांचे आभार व्यकत केले. यावेळी संचालक मंडळातले भुपेंद्र मिश्रा, राहुल शामकुवर, संजय तलमले, विजय दुबे, सुभाष बोरकर, फिरोज शेख, रायपूरकर, राकेश मलेवार, आनंद बिसने, अजय गडकरी, माजी अध्यक्ष लांजेवार साहेब व सस्थांच पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या