चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-गळीत हंगाम २०२५–२६ मध्ये कारखान्यात उत्पादित झालेल्या १,००,१११ व्या साखर पोत्याचे पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते–पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, हा क्षण कारखान्याच्या वाटचालीतील अभिमानाचा ठरला.
या प्रसंगी कारखान्याच्या प्रगतीसाठी योगदान देणारे सर्व शेतकरी सभासद, ऊस उत्पादक, कामगार, अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदन. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातूनच ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे.
कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सदैव प्रगतिशील वाटचालीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सहकार, गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या बळावर हे शक्य झाले आहे.
या वेळी मा. सौ. सत्यप्रभादेवी मोहिते–पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. मिलिंद कुलकर्णी, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते–पाटील, मा. सौ. शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते पाटील तसेच कारखान्याचे संचालक श्री. सुरेश पाटील, श्री. महादेव शिंदे, श्री. सुनील माने, श्री. दादा पाटील, श्री. सुधाकर पोळ, श्री. नंदन दाते, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष श्री. सोमनाथ भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. देवीदास ढोपे, शिवामृत संचालक श्री. जगनाथ जाधव, श्री. विठ्ठल अर्जुन, श्री. शिवराज निबांळकर, श्री. अनिल वाघमोडे, श्री. सोपान देवकर, श्री. ज्ञानदेव निबांळकर, श्री. तुकाराम चव्हाण, श्री. संतोष शिंदे, श्री. बलभिम निबांळकर, श्री. लालासाहेब फडतरे, माजी उपसरपंच श्री. विष्णु भोंगळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. स्वरूप देशमुख, चिफ इंजिनिअर श्री. समाधान कागदे, जनरल मॅनेजर श्री. रविराज जगताप, चिफ केमिस्ट श्री. अभिजित माने, डिस्टिलरी मॅनेजर श्री. संजय मोरे, ऊस विकास अधिकारी श्री. कोडलकर, सुरक्षा अधिकारी श्री. ज्ञानदेव पवार, निकम साहेब यांच्यासह शेतकरी सभासद, ऊस उत्पादक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व शेतकरी बांधव, कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. सहकाराच्या बळावर शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याची वाटचाल अधिक बळकट होईल, असा विश्वास आहे.


0 टिप्पण्या