Ticker

6/recent/ticker-posts

हाळीहंडरगुळीत राष्ट्रीय बॅंकेची गरज

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 हंडरगुळी:—महाराष्ट्रासह आंन्ध्रप्रदेश,कर्नाटक व तेलंगणा या परराज्यातील जनतेची दैनंदिन आवक-जावक असलेल्या तसेच सर्वपक्षीय भलेबखळ नेते, पुढारी असलेल्या हाळी-हंडरगुळी या गावात एकही राष्ट्रीय बॅंक नाही. तसेच अशी एखादी बॅंक आणावी, याकरीता एकाही पुढा-याने कधी प्रयत्न केल्याचे आठवतही नाही. म्हणुन गाव पुढा-यांबद्दल बॅंक ग्राहक असलेल्यांमध्ये तीव्र नाराजी दिसतेय तेंव्हा एसबीआय,एचडीएफसी व एक्सीस या सारख्या बॅंकेची गरज पुर्ण करणार कोण?याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
बाजारासह अन्य किमासाठी चार राज्यातील व्यापारी,शेतकरी जनता यांची नेहमीच येथे ये-जा असते.तर स्थानिक व परप्रांतिय व्यापा-यांना राष्ट्रियक्रत बॅंक नसल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. हाळी महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आणि हंडरगुळीत जिल्हा बॅंक,भाऊसाहेब बॅंक अशा खाजगी बॅंका असल्याने या ठिकाणी ग्राहकांची विशेष म्हंजे जिल्हा बॅंकेत शेतकरी,निराधार, विधवा,अपंग यांचीच नेहमी मोठी गर्दी असते म्हणुन इतरांना तास्ंतास ताटकळत बसावे लागते.परिणामी याचा अनेकांना मानसिक ञास होत असतो.बॅंकेच्या रांगेत थांबून नव्हे तर घरी बसून येथील पुढा-यांचे कामे होतात.म्हणुन याचे सोयरसुतक या गावच्या एकाही पुढा-याला दिसत नाही.उदगीर शहरानंतर या गावात परप्रांतियांची मोठी ये-जा असून यामध्ये शेतकरी,व्यापारी यांची मोठी वर्दळ असते.५ हजार लोकसंख्या मागे १ राष्ट्रीय बॅंक हे आरबीआयचे धोरण आहे.आणि या धोरणानुसार या २ गावात २ राष्ट्रीय बॅंका पाहिजेत  पण या गावात असलेले पुढारी मोठ्या मनाचे व जनहिताचा विचार करणारे नाहीत.म्हणुनच येथे २ काय एकही राष्ट्रीय बॅंक नाही.आणि जेथे मोठ्या मनाचे व जनतेचा विचार व कल्याण करणारे पुढारी आहेत.त्या कांही लहान,मोठ्या गावात एक तरी राष्ट्रीय बॅंक आहे.तेंव्हा एसबीआयचे जे धोरण आहे त्याचे कोण बांधणार तोरण?याकडे हाळीहंडरगुळीकरांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या