Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने पुरवठा विभागाच्या विरोधात गाव बंद करून रस्ता रोको आंदोलनाचा इशारा.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने माढा तहसील कार्यालयास आज रोपळे आणि केवड गावातील ज्या लोकांना धान्य मिळत नाही त्या लोकांना मोफत धान्य मिळावे या साठी निवेदन देण्यात आले आहे. सर्वसामान्य शेतकरी गोर गरीब लोक गेली कित्येक वर्ष झाली धान्या पासून वंचित आहेत.     त्या सर्वांची रेशन कार्ड  ऑनलाईन करून देखील त्यांना धान्य मिळत नसल्याचे दिसत आहे. तहसील कार्यालयाकडून कोटा शिल्लक नसल्याचं कारण देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. म्हणून जर 1 जानेवारी 2026 पर्यंत जर या कार्डधारकांना धान्य नाही मिळाले तर रोपळे गाव बंद करून रस्ता रोको आंदोलन प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे प्रहार महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष विमलताई अनारसे यांनी सांगितले. केवड ग्रामपंचायतीचा ठराव देऊन 6 महिने उलटून  गेले असून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.  या दोन गावाचा प्रश्न मार्गी न लागल्यास तालुक्यातील प्रत्येक गावातील जे लोक लाभापासून वंचित असतील त्यांना लाभ देण्यासाठी   1 जानेवारी नंतर संपूर्ण माढा तालुक्यातील प्रत्येक गावातील ठराव घेऊन प्रत्येक गावातील जे घटक या लाभापासून वंचित आहेत त्या सर्वांना घेऊन धान्य मिळण्यासाठी तहसील कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी सांगितले.*
*या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे,  बिभीषण अनारसे, प्रहार विद्यार्थी तालुका अध्यक्ष प्रवीण लोकरे, संतोष कोळी यांचे सह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या