चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर:-अधिवेशन काळात “मागण्यांसाठी” असंख्य मोर्चे होतात. पण सरकार करत असलेल्या कामांचे कौतुक म्हणून किंवा मागण्या मान्य झाल्यानंतर सार्वजनिक स्वरुपात कोणी आभार व्यक्त करताना दिसत नाही. पण दिव्यांग बांधवांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
दिव्यांग संघटनेकडून करण्यात आलेल्या अभिनंदन व सत्काराबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..
दिव्यांग कल्याण विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर आपण दिव्यांगाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये दिव्यांगांना प्रतिमहा २५०० रुपये निवृत्ती वेतन सुरू केले आहे. शासकीय व अशासकीय कार्यालयात दिव्यांगाचा ४% अनुशेष त्वरित भरण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगाच्या विवाहासाठी २.५ लाख अनुदान जाहीर केले आहे.
या महत्वपूर्ण निर्णयांबद्दल राष्ट्रीय विकलांग संघटने अतंर्गत असलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विधानभवन येथे भेट घेऊन अभिनंदन केले.
यावेळी सुनंदाताई त्र्यंबक मोकासरे, श्री.राजेश हाडके, श्री.त्र्यंबक मोकासरे, दिव्यांग बांधवांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश होता.


0 टिप्पण्या