चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-राज्यात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी, ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक आहे ,तर आरटीओमधील एजंटगिरी बंद होणार याबाबत बाबत अत्यंत महत्त्वाचे आदेश राज्यसरकारने दिले आहेत ,तर त्यासंदर्भात कडक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण अजपैकि पाच टक्के अर्जदारांची पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी, अत्यंत महत्त्वाची आदेश दिले आहेत. आरटीओला कडक सूचना दिल्या आहेत.
राज्यातील वाढत्या अपघातांची संख्या आणि रस्त्यांवर गुणवत्तापूर्ण वाहन चालकांची गरज लक्षात घेऊन राज्यातील परिवहन विभागाने ड्रायव्हिंग लायसन्स , चाचणी प्रक्रियेत क्रांतिकारी बदल करत ती अधिक पारदर्शक आणि कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. राज्यात ऑनलाइन अपॉइंटमेंट अनिवार्य असणार आहे. कायमस्वरूपी लायसन्ससाठी आता परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे एजंटगिरीला आळा बसेल आणि प्रक्रियेत सुसूत्रता येईल.
राज्यात सगळीकडे वाहतुकीच्या व वर्दळीच्या रस्त्यावर सीसीटीव्हीची निगराणी असणार आहे. राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नवीन नियम अंमलबजावणी केली जाणार आहे.आता राज्यातील सर्व मोठया वाहतुक मार्गांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱा आणि पोलिस ,गार्ड यांची नजर असणार आहे. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी प्रक्रियेतील प्रत्येक हालचाल रेकॉर्ड होईल आणि गैरप्रकारांना वाव राहणार नाही. राज्यातील आरटीओ अधिकाऱी व कर्मचारी यांची उपस्थितीत ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी होणार आहे. आरटीओ संबंधित अधिकाऱी वकर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया सरकारच्या नियमांनुसार पार पडेल.
नवीन लायसन बनवताना सर्व ड्रायव्हिंग लायसन्स चालकाच्यास कायदेशीर सर्व कागदपत्रांची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे. सर्व अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी अत्यंत कठोरपणे केली जाईल, ज्यामुळे केवळ वैध आणि पात्र अर्जदारांनाच राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी देण्याची परवानगी मिळणार आहे. राज्यातील पाच टक्के लोकांची पुन्हा ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी करण्यात येणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीत उत्तीर्ण झालेल्या एकूण अर्जदारांपैकी पाच टक्के लोकांची अचानकपणे पुनर्चाचणी घेतली जाईल. यामुळे चाचणी प्रक्रियेची विश्वासार्हता वाढेल.
राज्यातील आरटीओ चाचणीत गैरव्यवहार झाल्यास ससंबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.राज्यातील परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी दरम्यान किंवा प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित अर्जदार तसेच अधिकाऱी व कर्मचारी यांवर तत्काळ आणि कठोर कारवाई केली जाणार आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी उत्तीर्णचे प्रमाण 90 टक्कयांपेक्षा जास्त असल्यास, परत सर्व कागदपत्रांची चौकशी केली जाणार आहे.
राज्यात वाहन चालवण्याच्या ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण दहा टक्कयांपेक्षा कमी असेल तर, प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना काटेकोर लक्ष ठेवावे लागेल. तसेच, राज्यातील ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण अर्जा पैकी पाच टक्के अर्जदारांची पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या शेवटी सादर करावा लागणार आहे. त्यामुळे राज्यात सर्व वाहन चालकांसाठी पक्का वाहन परवाना देण्यासाठी काटेकोरपणे लक्ष दिले जाणार आहे, याबाबत बाबत अत्यंत महत्त्वाचे आदेश राज्यसरकारने दिले आहेत.


0 टिप्पण्या