Ticker

6/recent/ticker-posts

गोवंडीतील 'वंचित'च्या जनआक्रोश मोर्चाला पोलिसांचे दडपशाही; कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करून ताब्यात घेतले!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेशच्या वतीने गोवंडी येथील एम वॉर्डमधील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाला पोलिसांनी दडपले. शांततेत आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण करून ताब्यात घेण्यात आले आहे. 

गोवंडीतील एम वॉर्डमधील रहिवाशांच्या मूलभूत आणि विविध मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांनी दडपशाहीचा वापर  करत आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांना ताब्यात घेतले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या