Ticker

6/recent/ticker-posts

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या विकास कामाला प्रभाग क्रमांक एक पासूनच शुभारंभ.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती -: नग्परिषदचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी आणि प्रभाग क्र. एकचे नवनिर्वाचित नगरसेवक महेश जिवतोडे यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच नगराध्यक्ष चटकी व नगरसेवक जिवतोडे यांनी आपल्या विकास कामास गौतम नगर प्रभाग क्रमांक एक पासुनच शुभारंभ केले आहे. 
गौतम नगर परिसरातील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा व घाणीबाबत काही नागरिकांनी त्यांच्याकडे  तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकीव नगरसेवक महेश जिवतोडे यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान नारिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाला तात्काळ   साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधीत विभागाने तात्काळ कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्याची कारवाई सुरु केली. 
यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवकानी शहरातील कोणत्याही भागात अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही. असे सांगितले. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड न करता तात्काळ उपाययोजना केल्या जातील. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीनी दाखविलेल्या तत्परतेमुळे गौतम नगरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहराची स्वच्छता व विकासासाठी प्रशासन अधिक सक्रिय होईल. अशी अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या