चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे :-भिडेवाडाकार संविधान दुत फुले प्रेमी फुलेपुत्र कवि विजय वडवेराव सर आयोजित जगातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे 2026 एस एम जोशी फाऊंडेशन सभागृह नवी पेठ पुणे येथे साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय काव्य जागर पुणे फेस्टिवलचा कार्यक्रम दि. 2जानेवारी 2026 ते 5 जानेवारी 2026 आयोजन करण्यात आले यात जगभरातील आठशेहुन अधिक साहित्यक कलावंत सहभागी झाले होते या फेस्टिव्हलमध्ये कवी उमेश बाऱ्हाटे बौद्धाचार्य यांना आयोजक विजय वडवेराव सर यांनी या फेस्टिव्हलमध्ये अध्यक्ष व कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहण्यासाठी अधिकृत निवडपत्र पाठवले त्याअनुषंगाने कवि उमेश बाऱ्हाटे यांनी पहिल्याच दिवशी सहभाग नोंदवून भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर आपलीं स्वरचित रचना जोतीबानी लावला खरोखर लळा सादर केली त्यांच्या या प्रेरणादायी रचनेला टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कवी बाऱ्हाटे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान व उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजक विजय वडवेराव सर यांच्या हस्ते संविधान ग्रंथ सन्मानचिन्ह सन्मानपत्र मानाचा पटा संविधानमय शालेय पॅड देवुन यथोचित सन्मान करण्यात आला या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये देश विदेशातील साहित्यिक कवी कवियत्री कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 टिप्पण्या